नागपुरात रेफर कोरोना बाधितांच्या मृत्यूचा टक्का अधिक

death rate of refer corona patients is more in nagpur
death rate of refer corona patients is more in nagpur

नागपूर : मेडिकल, मेयो, एम्स या तीन रुग्णालयांत अवघे १७५ गंभीरावस्थेतील कोरोनाबाधित दाखल आहेत. विशेष असे की, दर दिवसाला खासगीसह बाहेर जिल्ह्यातून रेफर होऊन येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून या रेफर बाधितांच्या मृत्यूचा टक्का वाढला आहे. दर दिवसाला दोन किंवा तीन बाधित मेडिकलमध्ये रेफर केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपुरात ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. नागपूर महापालिकेचा कोरोना अहवाल आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अहवालातील कोरोनाची रुग्ण संख्या वेगवेगळी दाखवली जात असल्याचा घोळ पुन्हा एकदा पुढे आला आहे. यापूर्वी दै. सकाळने हा घोळ पुढे आणला होता. 

 नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून १६ नोव्हेंबरला मेडिकलमध्ये १०७ कोरोनाबाधित दाखल असल्याचे दाखवण्यात आले. तर लगेच १७ नोव्हेंबरला ही संख्या २१४ पोहचल्याचे दाखवण्यात आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचा घोळ कधी संपेल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. 

यावरून उपराजधानीत महापालिका, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. सुरुवातीला रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती, त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकाचा अहवाल सात वाजता येत होता. मात्र रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यानंतर मात्र महापालिकेतील अधिकारी सुस्तावले असल्यानेच रात्री उशिरापर्यंत आकडेवारीचा अहवाल येत नसल्याची जोरदार चर्चा पसरली आहे.विशेष असे की, दोघांच्याही आकडेवारीत भिन्नता दिसून येते.

शासकीय रुग्णालयांत दाखल रुग्णसंख्या घटली

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ९४ सक्रिय कोरोना बाधित रुग्ण असून त्यातील २ हजार ५४१ रुग्ण शहरात तर ५५३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. पैकी ८४८ बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. त्यातील केवळ २८८ रुग्ण मेडिकल, मेयो, एम्समध्ये तर इतर ३० ते ४० रुग्ण महापालिकेची विविध रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

दाखल रुग्ण ः १७ नोव्हेंबर

मेडिकल- २१४
मेयो- ४३
एम्स- ३१
इंदिरा गांधी रुग्णालय- १०
आयसोलेशन हॉस्पिटल- २


दाखल रुग्ण ः १६ नोव्हेंबर

मेडिकल- १०७
मेयो- ४८
एम्स- १३
इंदिरा गांधी रुग्णालय- १३
आयसोलेशन हॉस्पिटल- २

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com