कर्ज व वीज माफीच्या घोषणा फसव्या की खऱ्या...वाचा नेमके काय

Debt and power waiver announcements are fraudulent ... Read on
Debt and power waiver announcements are fraudulent ... Read on

नागपूर :  महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय, खोटारडे, दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करीत भाजपच्यावतीने आज शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारासंघात आंदोलन करून सरकार विसर्जित करण्याची मागणी केली.


भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पूर्व नागपूरमध्ये छापरूनगर चौकात केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. बावनकुळे यांनी या सरकारने आधी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती ती अद्याप दिली नसल्याचे सांगितले. आता शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. तीसुद्धा फसवीच ठरणार असल्याचा आरोप केला. कृष्णा खोपडे यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी अधिक निधी दिला नाही तर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला. प्रवीण दटके यांनी गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि राज्यात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याचे सांगून गुन्हेगारीसुद्धा वाढल्याचा आरोप केला.
दक्षिण-पश्‍चिममध्ये महापौर संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर कोहळे, पश्‍चिम मंडळात माजी आमदार सुधाकर देशमुख, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, उत्तरमध्ये माजी आमदार डॉ. मिलिंद माने, धर्मपाल मेश्रा, मध्य मंडळात आमदार गिरीश व्यास, विकास कुंभारे, दक्षिणमध्ये आमदार मोहन मते, दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, कीर्तीदा अजमेरा यांच्या नेतृत्वात आदोंलन करण्यात आले. आंदोलनात संजय अवचट, किशोर पलांदूरकर,विनोद कन्हेरे, संजय चौधरी, देवेन दस्तुरे, किशोर वानखेडे यांच्यासह प्रमोद पेंडके, बाल्या बोरकर, राम अंबुलकर, सचिन करारे, चेतना टांक, भोजराज डुम्बे, सुनिल मित्रा, चंदन गोस्वामी, नरेंद्र लांजेवार, देवेन मेहर, कांता रारोकर, मनीषा धावडे, नीता ठाकरे, प्रीती राजदेरकर, वैभव चौधरी, शाम थोरात, मानाराम जांगिड ,सुनील मानकर, किशोर पेठे, प्रशांत कामडी, ऋतु झलके, माधुरी ठाकरे,अभय गोटेकर, रुपाली ठाकूर, स्नेहल बिहारे, श्‍याम निशल, उषा पायलट, शीतल कामडे, नागेश सहारे, भगवान मेंढे, कल्पना कुंभलकर,राजू नागुलवार, स्वाती आखतकर, मंगेश खिलारे, राजेन्द्र सोनकुसरे, वंदना भगत, मालती ममिडवार, सुनंदा नाल्हे, रिता मुळे, संजय ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागही झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com