कर्ज वाढत गेले, अन्‌ "त्याने' घेतला अघोरी निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

शेवटी त्याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास गावालगतच्या जाम नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला. या बाबतची माहिती जलालखेडा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठले. मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला व पुढील तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. पुढील तपास जलालखेडा करीत आहेत.

नरखेड/जलालखेडा(जि.नागपूर) : येथून अगदी 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नायगाव (ठाकरे) येथील राहुल रमेश काळबांडे (वय 26) हा गेल्या दोन दिवसांपासून घरून निघून गेला होता. घरच्यांनी खूप शोधाशोध केली, पण तो मिळाला नाही. घरच्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. शेवटी त्याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास गावालगतच्या जाम नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला. या बाबतची माहिती जलालखेडा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठले. मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला व पुढील तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. पुढील तपास जलालखेडा करीत आहेत.

 

क्‍लिक करा  : पहाटे उठून सडा, रांगोळी टाकताय...ही घ्या काळजी...

 

चिठ्‌ठीत लिहिले होते कारण
बॅंकेच्या उदासीन धोरणमुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्‌ठीत नमूद केले. त्याच्यावर खासगी बॅंकांचे होते कर्ज. तसेच तो शिक्षित असून काम मिळत नसल्याने तो त्रस्त होता. युवकाचे मुद्रा कर्ज मंजूर होऊनही जलालखेडा येथील बॅंकेच्या व्यवस्थापकांनी त्याला पुढील कर्जासाठी झुगारणी दिली. याशिवाय एका फायनान्स कंपनीने त्याला कर्जवसुलीसाठी खूप त्रास दिला, असे नातेवाइकांनी सांगीतले. जलालखेडा येथील बॅंकेच्या व्यवस्थापकाने युवकाला मंजूर कर्ज दिले असते तर त्याला महागडे व्याजदराचे खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज घ्यावे लागले नसते व त्याचा जीव संबंधित बॅंकांच्या हलगर्जीपणामुळे गेला नसता असे मृत्युपत्रात त्याने नमूद केलेले होते.

क्‍लिक करा  : तुमची मुलगी वयात आली का? लक्ष द्या, तिच्यासोबत होउ..

कर्जवसुलीसाठी बजावली होती नोटीस
तसेच काटोल येथील बॅंकेने 27 हजार रुपयांच्या कर्जवसुलीची नोटीस बजावली होती, असे सांगण्यात येते. एकुलत्या एक मुलाचा आधार हरविल्याने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The debt kept rising, and "he" made a very bad decision ...