हिवाळी अधिवेशनात सीबीएसई शाळा प्राधीकरण कायदा

मंगेश गोमासे
Friday, 9 October 2020

सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा) च्या अध्यक्षा दिपाली डबली व सिस्वाच्या कार्यकारिणी सदस्यांनी ५ ऑक्टोबर रोजी मा. नाना पटोले यांची हैद्राबाद हाऊस, सिव्हील लाईन्स येथे भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी सिस्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, सीबीएसई शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्‍या अनेक समस्या आहेत. सिस्वा सीबीएसई शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्‍नशील असते, ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे.

नागपूर ः नागपुरात होणाऱ्या येत्या डिसेंबर महिन्‍यात होणा-या हिवाळी अधिवेशनात सीबीएसई शाळा प्राधीकरणाचा कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा)च्या अध्यक्षा दिपाली डबली यांना दिले.

सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा) च्या अध्यक्षा दिपाली डबली व सिस्वाच्या कार्यकारिणी सदस्यांनी ५ ऑक्टोबर रोजी मा. नाना पटोले यांची हैद्राबाद हाऊस, सिव्हील लाईन्स येथे भेट घेतली.

यावेळी नाना पटोले यांनी सिस्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, सीबीएसई शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्‍या अनेक समस्या आहेत. सिस्वा सीबीएसई शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्‍नशील असते, ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे.

तांत्रिक गोंधळात ऑनलाईन परीक्षेचा शुभारंभ, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

केंद्र सरकारने सीबीएसई शाळा प्राधीकरण स्थापन करण्याचे अधिकार राज्याला दिले असून महाराष्‍ट्र सरकार लवकरच त्या‍वर निर्णय घेईल. येत्या डिसेंबर महिन्‍यातील हिवाळी अधिवेशनात सीबीएसई शाळा प्राधीकरण स्‍थापन करण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करून स्कूल ट्रिब्युनलचा कायदा प्रत्यक्षात आणण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या भेटीत सिस्वाच्या अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the December convention CBSE School Authority Act