'ओबीसी समाजातील मुलांना कमर्शिअल पायलट करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय'

decision for obc student become commercial pilot says vijay wadettiwar
decision for obc student become commercial pilot says vijay wadettiwar

नागपूर : बहुजन समाजातील लोकांची त्यांच्या मुलांची परिस्थिती फार नाजूक आहे. तरीदेखील काही लोक आमच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओबीसीमध्ये भटक्या जमाती, बंजारा, नाथजोगी, वडार अशा अनेक जाती आहेत. यामधील काही वर्षानुवर्षांपासून पालांमध्ये राहत आहेत. या समाजाच्या वेदना आम्हाला कळतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आमच्याही डोळ्यांतून पडतात. महाज्योतीच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सागितले.

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका आणि पीएचडीच्या मागे न लागता जेईईई, नीट, स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, पोलिस प्रशिक्षण याकडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे. ओबीसी विद्यार्थी कमर्शीअल पायलट झाले पाहिजे, यासाठी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पायलटचे कमर्शिअल प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा करार होणार आहे. बहुजनांची मुले पायलट म्हणून तेथे गेली पाहिजेत, असा महाज्योतीचा प्रयत्न आहे. सीए आणि बँकांच्या परीक्षांमध्येही बहुजन विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे, अशी महाज्योतीची इच्छा आहे. 

पीएचडीसाठी यावर्षी आम्ही २०० विद्यार्थी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात ही संख्या वाढवता येईल. पण सध्या २०० विद्यार्थ्यांठी जाहिरात काढली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. व्हीजेएनटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपचे पैसे मिळण्यासाठी उशीर झाला. यामध्ये ट्रेझरीकडून काही समस्या निर्माण झाल्या होत्या. कारण मागच्या सरकारने खासगी बँकेमध्ये पैसे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता आमच्या सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पैसे वळते होण्यास वेळ लागला. परंतु, आता व्हीजेएनटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप लवकरात लवकर वितरीत करण्यात येणार आहे. ओबीसी विभागातर्फे ६०५ अभ्यासक्रमांना स्कॉलरशीप दिली जाते. यामध्ये आता वाढ करून एमएससी आणि कॉम्प्युटर सायन्सचा समावेळ पुढील सत्रापासून करण्यात येणार आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com