
नागपूर : नव्या कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असली तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली. आज जिल्ह्यात ३२० बाधित आढळून आले असून सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ४ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये ४ हजारांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या अहवालातून ३२० जण नवे बाधित आढळून आले आहे. यात शहरातील २७१ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ४६ तर जिल्ह्याबाहेरील तिघे बाधित झाले. शहरातील एकूण बाधितांची संख्या ९६ हजार ३०२ पर्यंत पोहोचली. याशिवाय २४ हजार ५९७ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरील बाधितांची एकूण संख्या ७६७ झाली.
उपचार घेत असताना आज जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील दोघे, ग्रामीण भागातील एक तर जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. या मृत्यूसह जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या ३ हजार ८८४ पर्यंत पोहोचली. यात शहरातील २ हजार ६२० तर ग्रामीण भागातील ६७९ जणांना जीव गमवावा लागला.
शहराबाहेरील ५८५ जणांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या २४ तासांत शहरातील विविध लॅबमध्ये ४ हजार २८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ९ लाख ६ हजार ३१८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान आज ३९८ बाधित कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३७६ तर ग्रामीणमधील २२ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख १३ हजार ७०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहरातील ९० हजार ५८७ तर ग्रामीणमधील २३ हजार ११८ कोरोनामुक्ताचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात चार हजार ७७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. शहरात ३ हजार ९५ तर ग्रामीण भागात ९८२ जण उपचार घेत आहेत. दोन हजार ७९५ जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
अहमदाबाद, गोवा, दिल्ली या तिन्ही शहरातून काल, गुरुवारी ८ विमाने शहरात आली. यातून ७०६ प्रवासी शहरात आले. यापैकी ६० संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या सर्वांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.