हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार; भाजपच्या दिग्गज नेत्याने केला आरोप

राजेश चरपे
Saturday, 21 November 2020

महावितरणला नुकसान असल्याचे सांगून सवलत देता येणार नाही असे जाहीर केले. महाआघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. एक मंत्री घोषणा करतो दुसरा नकार देतो असा प्रकार सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

नागपूर : निव्वळ पोक‍ळ घोषणा करायच्या आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची. हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तसेच विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कुणीही मागणी केली नसताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. यावर त्यांच्याच सरकारमधील इतर मंत्र्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. नंतर कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलात सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

त्यानंतर दोन हजार कोटीपर्यंत माफी देण्याची घोषणा केली. आता महावितरणला नुकसान असल्याचे सांगून सवलत देता येणार नाही असे जाहीर केले. महाआघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. एक मंत्री घोषणा करतो दुसरा नकार देतो असा प्रकार सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहले, सजंय भेडे, जयप्रकाश गुप्ता, संजय बंगाले, चेतना टांक, संजय ठाकरे, विनोद कन्हेरे, देवेंद्र दस्तुरे, डॉ. गिल्लूरकर, डॉ. संजीव चौधरी, सुरेंद्र दुरुरगकर, आर. सी. गुल्हाने, पिंटू झलके, छोटू भोयर उपस्थित होते.

जाणून घ्या - हृदयद्रावक! लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

विकासकामे रोखण्याचे एकमेव काम

सरकारकडे युवकांना रोजगार देण्याची कोणताही ठोस योजना नाही. भाजपच्या कार्यकाळात शिक्षकांना वीस टक्के अनुदान दिले होते. आघाडी सरकारने ते रोखले. विकासकामे रोखण्याचे एकमेव काम हे सरकार करीत आहे. उद्धव ठाकरे राज्याचे नव्हे तर फक्त मुंबईचे मुख्यमंत्री असल्या सारखे वागत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis accuses the government