
आता लँडलाईनवरून कोणत्याही मोबाईलवर फोन करताना क्रमांकापूर्वी '०' जोडावा लागणार आहे. नागपुरात शुक्रवारपासून नव्या पॅटर्ननुसारने कॉलिंग सुरू झाले आहे.
नागपूर : बीएसएनएलच्या लँडलाईनवरून कोणत्याही मोबाईलवर कॉल करण्याच्या डायलिंग पॅटर्नमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लँडलाईनवरून कोणत्याही मोबाईलवर फोन करताना क्रमांकापूर्वी '०' जोडावा लागणार आहे. नागपुरात शुक्रवारपासून नव्या पॅटर्ननुसारने कॉलिंग सुरू झाले आहे. सध्या जुन्या पद्धतीने फोन लागत असले तरी अल्पावधीत ही पद्धती बाद होणार आहे.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
काळानुरूप वाढत्या ग्राहकसंख्येसोबत लँडलाईनच्या डायलिंग पॅटर्नमध्ये बदल करण्यात आले. मोबाईल येण्यापूर्वी नागपूर शहरात विशिष्ट भागानुसार लँडलाईन क्रमांक होते. सहा आकडी क्रमांक नंतर सात क्रमांकाचा झाला. पण, जुनाच क्रमांक कायम ठेवून तो डायल करताना पूर्वी २ जोडण्याची पद्धती सुरू करण्यात आली. मोबाईल आल्यानंतर सुरुवातीच्या काळात सात डिजीटचे क्रमांक असायचे. नंतरच्या काळात मोबाईल ग्राहकांची संख्या वाढल्याने मोबाईल क्रमांक १० डिजीटचे झाले. कंपन्या, सर्कल व झोन नुसार मोबाईल क्रमांकाची रचना असते.
हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
आतापर्यंत अन्य राज्यांमधील मोबाईलवर अर्थात रोमिंगमधेये असणाऱ्या मोबाईलवर फोन लावताना '०' जोडणे आवश्यक होते. आता मात्र बीएसएनएलने डायलिंग पॅटर्नमध्ये बदल केला आहे. लँडलाईनवरून कोणत्याही मोबाईलवर फोन लावताना सर्वप्रथम '०' लावणे गरजेचे करण्यात आले आहे. यासाठी कोणतेही विशेष कारण देण्यात आले नसले तरी हीच व्यवस्था यापुढे कायम राहणार असल्याचे म्हणले आहे. नागपुरात शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पण, त्याबाबत फारशी माहिती नसल्याने तूर्त दहा डिजीट दाबताच फोन लागत आहे. पण, लवकरच '०' आवश्यक होणार आहे. तो न लावल्यास चुकीचा क्रमांक लागल्याची क्लिप पलीकडून वाजणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या सूत्रांकडून देण्यात आली.
हेही वाचा -
अलीकडच्या काळात मोबाईलची सरशी झाली असल्याने लँडलाईनची संख्या फारच कमी असली तरी कार्यालयीन कनेक्शनची संख्या मोठी आहे. लँडलाईन फारसा वापरला जात नसला तरी ब्रॉडबँड सेवेसाठी अनेकांनी बीएसएनएलचे कनेक्शन घेतले आहे. अशा घरांमध्ये लँडलाईन असतात. त्यावरून मोबाईलवर कॉल करताना आता आधी '०' लावणे आवश्यक झाले आहे.