Digital thermometer looks at tigers in Gorewada
Digital thermometer looks at tigers in Gorewada

वाढत्या उन्हामुळे गोरेवाड्यातील प्राण्यांसाठी केली ही सुविधा...

नागपूर : राज्यातील उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाचा चटका माणसांसोबतच वन्यप्राण्यांना बसत आहे. गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन पाहुण्यांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी पिंजऱ्यांमध्ये कूलर लावले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वन्यप्राण्यांचा बचाव करण्यासाठी आतापर्यंत कूलर लावण्यात आले नव्हते. वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची होणारी अस्वस्थता लक्षात घेता कूलर लावण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंजऱ्यातील तापमानावर डिजिटल थर्मामीटरच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले जाते.

 धक्‍कादायक... सीमेवरील चेकपोस्टवर
शिक्षकांची ड्यूटी

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हिरव्या जाळ्यांची आच्छादने टाकली आहेत. हरणांच्या कळपांना संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था केली आहे. पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघिणी, बिबट आणि अस्वलांना दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये, यादृष्टीने डेझर्ट कूलर बसविले आहेत. त्यात पाणी टाकण्यासाठी कर्मचारी तैनात आहेत. नागपूरचा पारा 42 ते 44 अंशांवर गेल्याने खबरदारी घेतली जात आहे. प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना रोजच्या आहारावरही विशेष लक्ष दिले जात आहे. गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात नऊ पट्टेदार वाघ, 29 बिबट, 10 अस्वल, 50 हरीण, सांबर, चितळ, 18 माकड आणि विविध प्रकारचे पक्षी आहेत. हिंस्र प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या पिंजऱ्यांभोवती थंडाव्यासाठी हिरव्या जाळ्यांचे आच्छादन लावले आहे.

वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्यांना कूलर लावले आहेत. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोना झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आल्या होत्या. त्यात तापमान वाढल्याशिवाय कूलर लावण्यात येऊ नये असे सुचविले होते. तापमानाने 40 अंश सेल्सियसपेक्षा अधिकचा आकडा पार केल्यानंतरच कूलर लावले आहेत. वन्यप्राणी असलेल्या पिंजऱ्यातील तापमान अधिक कमी होऊ नये आणि अधिक वाढूही नये यासाठी त्यात डिजिटल थर्मामीटरही लावले आहे. त्या थर्मामीटरनुसार कूलर बंद अथवा चालू केले जातात. दुपारी बारा ते चारपर्यंत तापमान वाढत असल्याने त्यासाठी कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. बछडे असलेल्या पिंजऱ्याचे तापमान कमी होऊ नये म्हणून अधिकचे कूलर लावले आहेत.



कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डिजिटल थर्मामीटर
गोरेवाडा बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कूलर लावले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंजऱ्यातील तापमान कायम राहावे यासाठी डिजिटल थर्मामीटर लावले आहेत. त्यानुसार, कूलर बंद अथवा सुरू करण्याची व्यवस्था आहे.
नंदकिशोर काळे, विभागीय वनाधिकारी,
गोरेवाडा प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com