बघा, नागपूरच्या विलगीकरण कक्षातील स्वच्छता, कसा बरा होणार पेशंट?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पिलो कव्हर घाणेरडे असल्याने ते काढून ठेवण्यात आले. मात्र, येथे आवाज दिल्यानंतरही कोणी येत नाही. विशेष असे की, येथे सडकी केळी आणि संत्री ठेवण्यात आली. त्याची दुर्गंधी येथे पसरली आहे, याकडे मात्र प्रशासन डोळेझाक करते. एकप्रकारे येथे राहणाऱ्या व्यक्तींना हा कोंडवाडा वाटत आहे. विदेशात आरामात दिवस काढणाऱ्यांना किमान येथे स्वच्छ बेटशिट, टॉवेल मिळणे अपेक्षित आहे. परंतु, याकडेही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली. 

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. डॉक्‍टर येथे अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांच्या सेवेचे कौतुक आहे. येथून संशयित व्यक्तींला आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मात्र, या विलगीकरण कक्षात घाणेरड्या पिलो कव्हर, घाणेरडे टॉवेल वापरायला मिळत असल्यामुळे येथे वास्तव्याला असलेल्या नागरिकांमध्ये असंतोष आहे. 

टॉवेलवर असलेल्या डागांतून दुर्गंधी 
कोरोना विषाणूपासून नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छतेचा ध्यास साऱ्या जगाने घेतला. सॅनिटायझरचा वापर आणि व्यापारही वाढला. मात्र, आमदार निवासातील विलगीकरण कक्ष या स्वच्छता राखा मंत्रापासून कोसो दूर आहे. विदेशात राहिलेल्या या व्यक्तींना अशाप्रकारचे अनुभव येथे येत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिलो कव्हर घाणेरडे असल्याने ते काढून ठेवण्यात आले. मात्र, येथे आवाज दिल्यानंतरही कोणी येत नाही.

विशेष असे की, येथे सडकी केळी आणि संत्री ठेवण्यात आली. त्याची दुर्गंधी येथे पसरली आहे, याकडे मात्र प्रशासन डोळेझाक करते. एकप्रकारे येथे राहणाऱ्या व्यक्तींना हा कोंडवाडा वाटत आहे. विदेशात आरामात दिवस काढणाऱ्यांना किमान येथे स्वच्छ बेटशिट, टॉवेल मिळणे अपेक्षित आहे. परंतु, याकडेही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली. 
 

जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही दीडशहाणे, पोलिसांनी असा दाखवला इंगा...

घाणेरडे पिलो कव्हर 
दर दिवसाला सुमारे 15 ते 20 व्यक्तींना आमदार निवासासातील विलगीकरण कक्षात आणले जाते. सध्या 86 जण या विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती उपलब्ध असताना, त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मात्र आमदार निवास कमी पडत असल्याची जोरदार चर्चा येथे पसरली आहे. यासंदर्भात आमदार निवासात संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dirtyness at mla hostel nagpur