जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही दीडशहाणे, पोलिसांनी असा दाखवला इंगा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी नागपूरकरांनी संयम दाखवित आज दिवस-रात्र घरात राहण्याचे व्रत स्वयंस्फूर्तीने पाळले. त्यामुळे शहरातील रस्ते जणू निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर संचारबंदीचा परिणाम दिसून आला. ऐरवी वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यावरही आज वाहन क्वचितच दिसून आले. नागपूरकरांनी स्वतःचेच विलगीकरण करीत संचारबंदीला अभूतपूर्व यश मिळवून दिले.

नागपूर : कोरोना विषाणूविरोधातील युद्ध म्हणून भारतीयांनी "जनता कर्फ्यू'त उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यानंतरही अनेकांना घराबाहेर पडण्याचा मोह आवरता आला नाही. आस्थापनाबंदीचे आदेश असूनही काहींनी दुकाने उघडी ठेवली. विविध कारणांवरून पोलिसांनी रविवारी दिवसभरात एकूण बाराशे जणांवर कारवाई केली.

नियम मोडणाऱ्या बाराशे जणांवर कारवाई 
देशभरात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. याशिवाय शहरात जमावबंदी आदेश लागू असून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. पोलिसही आज दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. घराबाहेर पडणाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी विचारपूस करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आज दिवसभरात साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये एकूण 35 जणांवर कारवाई करण्यात आली. आस्थापनाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 878 जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय आज शहराच्या विविध भागांत 66 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्या 297 जणांविरुद्ध चालान कारवाई करण्यात आली. पहाटे 5 वाजतापर्यंत ही कारवाई केली जाणार आहे.

878 ताब्यात : नाकाबंदीत 297 अडकले 
कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी नागपूरकरांनी संयम दाखवित आज दिवस-रात्र घरात राहण्याचे व्रत स्वयंस्फूर्तीने पाळले. त्यामुळे शहरातील रस्ते जणू निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर संचारबंदीचा परिणाम दिसून आला. ऐरवी वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यावरही आज वाहन क्वचितच दिसून आले. नागपूरकरांनी स्वतःचेच विलगीकरण करीत संचारबंदीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. कोरोना विषाणूच्या निमित्ताने प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत नागपूरकर उत्तीर्ण झाल्याचे दिसून येत असून सायंकाळी नागरिकांनी टाळ्या, ताट्या वाजवून गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची काळजी घेणारे डॉक्‍टर्स, नर्स, अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

हाच खरा कोरोना फायटर : जनता कर्फ्यूत दिली अंत्यसंस्कारासाठी सेवा

नागपूरकरांनी दाखवला संयम
जनता कर्फ्यूच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले. उद्याने बंद असल्याने दररोज रस्त्यांवर मॉर्निंगसाठी जाणाऱ्या नागरिकांनीही सकाळी घरीच व्यायाम आदी करण्यावर भर दिला. नागरिक दूध, ब्रेड खरेदीसाठीही बाहेर न पडल्याने सकाळपासूनच संचारबंदीचा परिणाम दिसून आला. शहरातील रिंग रोड किंवा सेंट्रल एव्हेन्यू, ग्रेट नाग रोड, व्हीआयपी रोड, वर्धा रोड, भंडारा रोड, अमरावती रोड, छिंदवाडा रोड या वाहनांच्या रांगा लागणाऱ्या प्रमुख मार्गावर वाहनेही शोधून सापडली नाही. एकूणच नागपूरकर घराबाहेर पडले नाही, मात्र, शहरात दुसऱ्या शहरातून वाहने आली नाहीत. त्यामुळे शहर मध्यवर्ती बसस्थानकही वर्दळीशिवाय दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action aginst nagpur people