कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

बस, कार, रुग्णवाहिका इत्यादी निर्जंतुकीकरण करता येणे शक्‍य होणार आहे. या दोन्ही यंत्रांचे डिझाइन तयार करण्याची जबाबदारी पडगीलवार ऍग्रो इंडस्ट्रीजचे प्रख्यात उद्योगपती तुषार पडगीलवार यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येत आहे. दोन्ही संशोधनांसाठी पेटंट सादर करण्यात आले आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून वापरण्यात येणाऱ्या साधनांचे निर्जंतुकीकरण कसे करता येईल, याकरिता कामठी येथील श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेद्वारे संचालित श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी 'मेडिकल फेस मास्क डिमोलिशर' आणि "वन मॅन ऑपरेटिंग युव्ही बेस्ड सॅनिटेशन फिक्‍स्ड ट्युनल युनिट' तयार करीत त्याचे पेटंट दाखल केले आहे. 

देशात कोरोना महामारीचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. सध्या त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विविध संस्थांकडून संशोधनावर भर दिला जात आहे. यामध्ये शहरातील महाविद्यालयांसह संस्थांनीही अग्रणी भूमिका घेतली आहे. व्हीएनआयटीसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभागांनी निर्जंतुकीकरण यंत्र तयार करण्याचे काम केले आहे.

यात आता श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयानेही सहभाग नोंदविला आहे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, प्राध्यापक डॉ. कमलेश वाढेर, सहायक प्राध्यापिका नेहा राऊत आणि विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे यांनी 'मेडिकल फेस मास्क डिमोलिशर' आणि 'वन मॅन ऑपरेटिग युव्ही बेस्ड सॅनिटेशन फिक्‍स्ड ट्युनल युनिट' तयार केले आहे. 

पहिल्या संशोधनात वापरलेला फेस मास्कमधून संसर्गाचा धोका अधिक असल्याने त्याला नष्ट करण्यासाठी 'मेडिकल फेस मास्क डिमोलिशर' अत्यंत कार्यशील ठरणार आहे. त्यातून पोर्टेबिलिटी, दुहेरी निर्जंतुकीकरण, यूव्हीसी इन्सिनेटरच्या तुलनेत मोठे पर्यावरण संरक्षण, सुरक्षा आणि आरोग्यसेवा देता येणे शक्‍य होणार आहे. दुसऱ्या संशोधनात सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्राध्यापकांनी दाखल केलेले दुसरे पेटंट आहे? 'वन मॅन ऑपरेटिंग यूव्ही बेस्ड सॅनिटेशन फिक्‍स्ड ट्युनल युनिट' तयार केले आहे.

हेही वाचा : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे 'लर्न फ्रॉम होम'

यामुळे बस, कार, रुग्णवाहिका इत्यादी निर्जंतुकीकरण करता येणे शक्‍य होणार आहे. या दोन्ही यंत्रांचे डिझाइन तयार करण्याची जबाबदारी पडगीलवार ऍग्रो इंडस्ट्रीजचे प्रख्यात उद्योगपती तुषार पडगीलवार यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येत आहे. दोन्ही संशोधनांसाठी पेटंट सादर करण्यात आले आहे. संशोधनाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. नीरज खटी तसेच भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ओ. पी. चिमणकर यांचे सर्व संशोधक प्राध्यापकांनी आभार व्यक्त मानले. शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी शोधकांचे कौतुक केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discovery of sterile device to prevent corona infection