अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे 'लर्न फ्रॉम होम'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षणात थांबला तो संपला. त्यामुळे लर्न फ्रॉर्म होम ही संकल्पना विविध महाविद्यालयांनी सुरू केली. यासाठी स्वतःचे सॉफ्टवेअरदेखील डेव्हलप करण्यात आले आहे. 

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान यूजीसीने फक्त अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याचे वेळापत्रकदेखील जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 'लर्न फ्रॉम होम' सुरू केले आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सुमारे 1 लाख 5 हजार विद्यार्थी हे अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी जुलैत परीक्षा होणार असल्याचे यूजीसीने जाहीर केले आहे. त्यामुळे पदवी, पदविका, अभियांत्रिकी, तांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, लॉ यांसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 'लर्न फ्रॉर्म होम' सुरू केले आहे. दरम्यान, आपला अभ्यास व्यवस्थित व्हावा, यासाठी विद्यार्थी ऑनलाइन ग्रुप स्टडी ही अभिनव संकल्पना राबवत आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षणात थांबला तो संपला. त्यामुळे लर्न फ्रॉर्म होम ही संकल्पना विविध महाविद्यालयांनी सुरू केली. यासाठी स्वतःचे सॉफ्टवेअरदेखील डेव्हलप करण्यात आले आहे. 
 
डिजिटल सुविधेचा वापर 
काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. या डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा डिजिटल क्‍लासरूमचे अनेक ऍप मोफत उपलब्ध असल्याने या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. 
 
हेही वाचा : पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रकारे सुरूच... वर्ध्यात अनर्थ टळला 

घरबसल्या अभ्यासक्रमाचे धडे 
विविध अभ्यासक्रमाचे महाविद्यालयांतर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहेत. हे ऑनलाइन क्‍लासेस मार्च महिन्यापासून सुरू झाले आहेत. या ऑनलाइन स्टडीद्वारे अभ्यासक्रमदेखील पूर्ण झाला व आता परीक्षेसाठीदेखील उपयुक्त ठरत आहे. सोबतच वेळोवेळी विचारलेल्या शंकांचे निरसनसुद्धा याद्वारे केले जात आहे. 
 
 

अंतिम वर्षाची परीक्षा होणार असल्याने, आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. परंतु, कॉलेज, क्‍लासेस नसल्याने अनेक अडचणी येतात. अशा वेळी व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि झूम ऍपवरून कॉन्फरन्स कॉल करून ग्रुप स्टडी करीत एकमेकांना सहकार्य करतो. 
-श्रुतिका साबळे, विद्यार्थिनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn from home for final year students