Video : चिंता करू नका, नागपूर शहराचे होत आहे निर्जंतुकीकरण

Disinfection spraying in Nagpur city
Disinfection spraying in Nagpur city

नागपूर : शहरात नागरिकांच्या सर्व्हेक्षणानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीत असलेल्या नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे. "सकाळ'ने शहरात औषधी फवारणी करून निर्जंतुकीकरणासाठी वृत्त प्रकाशित करीत पाठपुरावा केला होता. त्यानुसार शहरात निर्जुंतीकरण करण्याला सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात भीतीचे वातावरण आहे. त्यातच शहरात डासांचा प्रार्दुभाव वाढला. मात्र, महापालिकेकडून औषधी फवारणी केली जात नसल्याकडे "सकाळ'ने 21 फेब्रुवारी तसेच 27 फेब्रुवारीला ठळकपणे वृत्त प्रकाशित केले होते. "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेत आयुक्तांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरातील दहाही झोनमध्ये औषध फवारणीचा निर्णय घेतला. 

शहरात डासांचा उद्रेक वाढला असून कोरोनापाठोपाठ मलेरिया व डेंगीचीही भीती निर्माण झाली होती. नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनीच शहरात औषध फवारणी करण्याची मागणी केली होती. महापौर संदीप जोशी यांनीही शहरात फॉगिंगमशीनद्वारे डासांचा नायनाट करण्याचे निर्देश आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. प्रदीप दासरवार यांना दिले होते. 

वर्ध्यासारख्या लहान शहरात रस्त्यांचेही निर्जंतुकीकरण

वर्ध्यासारख्या लहान शहरात रस्त्यांचेही निर्जंतुकीकरण करण्यात येत असताना तीस लाख लोकसंख्येला सुविधा देणारी महापालिका हात आखडता घेत असल्याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आयुक्तांनी तातडीने शहर निर्जुंतीकरणासंदर्भात निर्देश देत फवारणी करण्यास आरोग्य विभागाला सूचना केल्या. त्यानुसार शहरात निर्जुंतीकरण करण्याला सुरुवात झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com