मेयो प्रशासनाविरोधात खदखदतोय असंतोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, नंदूरबारचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप देशपांडे यांच्या नेतृत्वातील समितीने मेयो, सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयांची पाहणी केली.

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनात मेयो प्रशासनाविरोधात असंतोष भडकला असल्याची माहिती पुढे आली आहे. शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून मेयोत नुकतेच निरीक्षण झाले. यात समितीने प्राथमिक अहवालात मेयो प्रशासनावर बोट ठेवले असल्याचे दिसून आले.

हे वाचाच - निघाल्या तलवारी आणि झाले सपासप वार

सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, नंदूरबारचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप देशपांडे यांच्या नेतृत्वातील समितीने मेयो, सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयांची पाहणी केली. पहिल्या दिवशी समितीने "मेडिकल'च्या जळीत रुग्ण विभागात शल्यक्रियागृह नसल्याचे उजेडात आणले. मेयोतील काही बाबींची प्रशंसा केली. मात्र, मेयोत झालेल्या सूक्ष्म निरीक्षणात येथील वॉर्डातील आंतरिक अस्वच्छता तसेच जळीत रुग्ण विभागात स्वतंत्र शल्यक्रियागृह नसल्याची बाब उजेडात आणली. विशेष असे की, मेयोत कर्मचाऱ्यांच्या मनात प्रशासनाविरोधात असंतोष खदखदत असल्याची नोंद समितीने घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction against Mayo administration