अनुयायांनो, दीक्षाभूमीवर गर्दी करू नका, घरीच करा बुद्धवंदना; स्मारक समितीचे आवाहन

राजेश चरपे 
Wednesday, 14 October 2020

धम्मदीक्षा सोहळ्यासाठी संपूर्ण राज्य तसेच विदर्भातून लोक गाड्या करून येतात. यावर्षी मुख्य सोहळा रद्द झाल्यामुळे बौद्ध अनुयायांनी कोणत्याही प्रवासाची योजना आखू नये. दीक्षाभूमीचे दरवाजे बंद राहणार आहेत

नागपूर ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवरील मुख्य धम्मदीक्षा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी न करता आपापल्या घरीच सकाळी नऊ वाजता बुद्धवंदना करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. यावेळी समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, अध्यक्ष भदन्त आर्य सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.

नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज

धम्मदीक्षा सोहळ्यासाठी संपूर्ण राज्य तसेच विदर्भातून लोक गाड्या करून येतात. यावर्षी मुख्य सोहळा रद्द झाल्यामुळे बौद्ध अनुयायांनी कोणत्याही प्रवासाची योजना आखू नये. दीक्षाभूमीचे दरवाजे बंद राहणार आहेत. तसेच उपराजधातील संघटनांनी रॅली काढू नये. कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली म्हणून यावर्षी दीक्षाभूमी स्तूपावर कोणतीही रोषणाई केली जाणार नाही, असे फुलझेले यांनी स्पष्ट केले.

२४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर स्मारक समिती सदस्यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी समता सैनिकदल मानवंदना देईल. २५ तारखेला सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात येईल. 

एकाच वेळी निघाली दोघींची अंत्ययात्रा; एकीच्या नशिबी शेवटचे सोपस्कारही नाही

तर सकाळी ९ वाजता स्तूपाच्या आत भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यासह स्मारक समिती सदस्यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता भिक्खू संघातर्फे बुद्ध गाथांचे पठण करण्यात येणार आहे. त्याचे मराठी व हिंदीत भाषांतर करण्यात येईल.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not gather at Dikshabhumi pray from home