शेतकऱ्यांनो, हिरव्या संत्र्याला गळती आली? घाबरू नका! कृषी विभागाने पुढील उपाय करण्याचा दिला सल्ला 

विजयकुमार राऊत 
Friday, 30 October 2020

सततधार पावसामुळे अनेक बुरशीजन्य रोगाला संत्रा हे फळपीक बळी पडत आहे़ लागून पडलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बांगावर फवारणीची संधीही मिळाली नाही़

कळमेश्वर (जि. नागपूर ):  दीड महिन्यापासून पावसाची सततधार असल्याने वातावरणात अनेक बदल झाले़ या बदलाचा परिणाम शेतीवर झाला आहे़ संत्रा पिकासह कपाशी, सोयाबीन व इतर भाजीपाला पिकावर हा परिणाम झालेला दिसून येत आहे़ या पावसामुळे हिरव्या संत्र्याला गळती लागली आहे़ ही गळती थांबविण्यासाठी कार्बेंन्डाझीमच्या फवारणीसह कृषी विभागाने शेतकऱ्यांना इतर उपायोजना सूचविल्या आहे़

सततधार पावसामुळे अनेक बुरशीजन्य रोगाला संत्रा हे फळपीक बळी पडत आहे़ लागून पडलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बांगावर फवारणीची संधीही मिळाली नाही़ त्यामुळे सद्यस्थितीत संत्राची फळगळ होतांना दिसून येत आहे़ संत्रा गळतीला अनेक कारणे असली तरी रस शोषण करणारा पंतग, सूक्ष्म अन्न द्रव्याची कमतरता आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारण आहे़ 

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी झाडाखाली गळलेली फळे तातडीने उचलून बागेच्या बाहेर टाकने किंवा ती पूरने करजेचे आहे़ सूक्ष्म अन्न द्रव्याची कमतरता असल्यास त्याची वेळीच फवारणी घ्यावी, बागेला पाण्याची त्वरित व्यवस्था करणे गरजेचे आहे़ ठिंबक असेल तर ठिंबक नी पाणी द्यावे किंवा झाडाच्या दोन्ही बाजूला दोन दांड फाडून पाणी द्यावे.

काही बागेत हिरवी संत्र फळे गळत असून देठाजवळ तपकिरी चट्टा झालेला असेल तर कार्बेन्डाझीम २०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, रोगाची तिव्रता जास्त वाटल्यास १० दिवसांनी याच औषधीची फवारणी करावी़ संत्रा फळ पिकामध्ये जर रस शोषण करणारा पंतग हया किडीमुळे फळ गळ होत असेल तर १ लिटर पाणी अधिक १०० ग्रॅम गुळ अधिक गळलेल्या फळांचा रस अधिक १० मिली़ मॅलाथीऑन याचे विषारी आमिष तयार करून हेक्टरी १० ते १२ डब्बे झाडावर टांगावेत़ पंतग पकडण्यासाठी प्रकाश सापळंयाचा वापर करावा़ बागेत सभ्ज्ञोवतालच्या गुळवेल, वासनवेल उपटून नष्ट कराव्यात अशा सूचना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रदेशीक फळ संशोधन केंद्र, काटोलच्या वतीने करण्यात आल्या आहे़

महत्वाची बातमी - पदवीधर निवडणूक : अनिल सोले की संदीप जोशी?, भाजपात एकच चर्चा

सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ कळमेश्वर व काटोल तालुका संत्रा उत्पादक तालुका असल्याने या भागात संत्रा पीकाचे नुकसान झाले असून उर्वरीत संत्रा फळावर सूक्ष्म अन्न द्रव्याची कमतरता आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ आधीच झालेले नुकसान बघता आता आणखी नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी काही सूचना या शेतकऱ्यांना करण्यात आल्या आहे़ शेतकऱ्यांनी त्यांची अमलबजावणी केली तर प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल़
- जगदीश नेरलवार
तालुका कृषी अधिकारी
कळमेश्वर

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do these remedies to protect your orange fruit crops from damage