दिवाळी आनंदात साजरा करण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी; जाणून घ्या काय सांगताहेत डॉ. अशोक मदान 

केवल जीवनतारे
Friday, 6 November 2020

दिवाळीत फोडलेल्या फटाक्‍यामध्ये चारकोल, गंधक, नायट्रो क्‍लोरेट, परफलोरेस्टसह इतरही घातक घटक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुरातून फुप्फुसांवर परिणाम होतो.

नागपूर ः दिवाळीत नकळत होणाऱ्या चुकांतून फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा होते. अंधत्व येण्याची भिती असते. भारतामध्ये फटाक्‍यामुळे पाच हजार व्यक्ती दरवर्षी अंध होतात. जगभरात पाच लाख लोक फटाक्‍यामुळे अंध होत असून यात पन्नास टक्के लहान मुले असतात, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागप्रमूख डॉ. अशोक मदान यांनी दिली.

दिवाळीत फोडलेल्या फटाक्‍यामध्ये चारकोल, गंधक, नायट्रो क्‍लोरेट, परफलोरेस्टसह इतरही घातक घटक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुरातून फुप्फुसांवर परिणाम होतो.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

यामुळे फटाक्यांपासून दूर राहावे. याशिवाय त्वचाविकारातही वाढ होण्याची भिती आहे. फटाक्‍यांचा तेजोमय उजेड आणि फटाके फोडलेल्या ठिकाणचे तापमान ४०० ते ५००० पर्यत वाढते, धूर निघतो. आवाजाचे अर्थात ध्वनिप्रदूषण, जल प्रदूषण, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. 

फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा झाल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची भिती असते. गंभीर दुखापतीमुळे डोळा काढावा लागू शकतो. दिवाळीच्या सणांत नकळत बाधित व्यक्तींपैकी ६० व्यक्ती २० वर्षाखालील असतात. ८० टक्के पुरुष असतात. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्‍यांमध्ये प्रामुख्याने अनार, सुतळीबॉम्ब आणि चक्री आणि रॉकेटचा समावेश असतो.

फटाके फोडताना लक्ष द्यावे

- फटाक्यांपासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे.
. पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे
- मोकळ्या जागेत फटाके फोडावे.
- शक्‍यतो सुती कपडे घालावे.
- रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू नये
-ध्वनिप्रदूषण करणा-या फटाके फोडू नये
-प्रकाश देणाऱ्या फटाक्‍यांचा वापर करावा.

जाणून घ्या - 'शौक के लिये कुछ भी करेगा'

नकळत फटाके फोडताना डोळ्याला इजा झाल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे चोळल्यास डोळ्यातीलद्रव्य बाहेर येऊ शकते. डोळ्यातील फसलेले कण आत खोलवर जाऊ शकते. त्यामुळे डोळा खराब होऊ शकतो. पाण्याने डोळा धुऊ नये. तसे केल्यास जंतुसंसर्ग वाढतो. डोळ्यांमध्ये मलम टाकू नये, त्वरित नेत्र रोगतज्ज्ञांना दाखवावे.
-डॉ. अशोक मदान, 
नेत्ररोग विभागप्रमुख, मेडिकल, नागपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Ashok madan told to be safe in this diwali