महामेट्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा;  डॉ. ब्रजेश दिक्षित यांना ‘पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

राजेश प्रायकर 
Saturday, 17 October 2020

‘फाउंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज (फर्स्ट) कंस्ट्रक्शन कौन्सिल' या बांधकाम क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

नागपूर ः नागपूर मेट्रोचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलेले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षत यांना बांधकाम क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही डॉ. दिक्षित यांचे कौतुक केले.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

‘फाउंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज (फर्स्ट) कंस्ट्रक्शन कौन्सिल' या बांधकाम क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. आभासी पद्धतीने आज पार पडलेल्या सोहळ्याला केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुखबीर संधू प्रमुख पाहुणे होते. 

यावेळी केंद्रीयमंत्री प्रधान यांनी या पुरस्काराचे महत्व विशद करताना डॉ. दिक्षित यांच्या कामाचे कौतुक केले. आजपर्यंत मेट्रोला अनेक पुरस्कार मिळाले. `कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०' पुरस्काराने महामेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. डॉ. दिक्षित यांनी हा पुरस्कार सहकारी, अधिकारी, सल्लगार, कंत्राटदार तसेच मेट्रो प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच समर्पित केला.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०‘ हा मोठा सन्मान असून आनंदाचा क्षण आहे. प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाला मिळालेली ही पावती आहे. माझ्यासह सर्व सहकारी, अधिकारी नागपूर आणि पुणे येथील नागरिकांसाठी जागतिक दर्जाची नागरी वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- डॉ. ब्रजेश दिक्षित, 
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor brijesh dixit got person of the year award