
नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले
नागपूर : तीव्र श्वसन रोग असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव जगात सुरू आहे. कोविड-१९ ची साथ रोखण्यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. कोविड रुग्णांचे जीव वाचविताना केवळ रोगप्रतिकाशक्ती वाढवणे हाच एक पर्याय आहे. कोविडच्या उद्रेकजन्य स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती म्हणून 'थायमोसीन अल्फा १' प्रभावी ठरत आहे. इम्युनोसिन अल्फा १ औषधातून पेशींच्या पूननिर्मितीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू
नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाले, इम्युनोसिन अल्फा १ एक अद्भुत रेणू उपचार पद्धत आहे. साथ आजारावर उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. विशेष असे की, कोविडसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच वृद्ध रुग्णांवर या उपचारपद्धतीतून त्यांचीही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे. डॉ. जयस्वाल म्हणाले, कोविड-१९ विषाणू व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आक्रमण करतो. यामुळे ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा येणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, ही लक्षणे आढळतात. अशा रुग्णांवर थायमोसीन अल्फा १ उपचारपद्धती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.
हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला...
२०० जणांना दिला डोस -
ही पद्धती प्रायोगिक स्तरावर आहे. मात्र, २०० जणांवर याचा वापर केला आहे. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुर्नरचना करून ताप आणि रोगदाहकता कमी करते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. कोविड–१९ नंतरच्या गुंतागुंतीवरही प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला.