
नागपूर : वीजेच्या धक्क्याने माकडाच्या पिलाचा एक हात व पायाचा पंजा गंभीररित्या होरपळला. तो ट्रान्सफार्मरला चिकटलेला अतचानाच सुदैवाने काही युवक तिथे पोहोचले. वेळीच बांबूच्या मदतीने त्याची सुटका करीत तातडीने डॉ. हेमंत जैन यांच्याकडे नेले. डॉ. जैन यांनी बेशुद्धावस्थेतील त्या पिलाला जीवदान दिले. सध्या त्याला वन विभागाच्या ट्रांजीट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत.
शनिवारी सकाळी वर्धा मार्गावरील छत्रपती चौकात हा दुर्दैवी घटनाक्रम घटला. छत्रपती चौकातील कल्पवृक्ष रुग्णालयालगत ट्रान्सफार्मार बसविले आहे. सकाळी ९ ते ९.१५ च्या सुमारास १५ -२० माकडांचा कळप या भागात आला. लगतच्या वृक्षांवर त्यांच्या मर्कटलीला सुरू होत्या. तेवढ्यात कळपातील एक पिलू अचानक ट्रान्सफार्मरच्या संपर्कात आले. स्पार्क होण्यासह ते ट्रान्सफार्मरला चिकटून पडले. हे चित्र बघणाऱ्या नागरिकांच्या हृदयात धस्स झाले. बघ्यांची गर्दी गोळा होऊ लागली.
तेवढ्यात सोमलवाड्यात राहणारे उत्तम रागीट, राहुलनगरचा रोनक खंडारे हे दोन प्राणीमित्रही तिथे पोहोचले. त्यांनी बांबूची जुळवाजुळव करीत पिलाची सुटका केली. बेशुद्धावस्थेत तो खाली पडला. उजवा हात व डाव्या पायाचा जवळपास अर्धा पंजा जळाला. दोन्ही युवकांनी धावपळ करीत त्या पिलाला रुग्णालयात नेले. पण, उपचार मिळू शकला नाही. छत्रपती चौकातच व्हेटर्नरी सर्जन डॉ. हेमंत जैन यांचा दवाखाना आहे. त्याची माहिती मिळताच युवक पिलाला घेऊन तिथे पोहोचले.
पिलाची हालचाल बंद होती. शॉकमुळे हार्टबिटही फारच कमी होते. धामन्यांमधील रक्तही गोठले होते. प्रसंग बाका असला तरी डॉ. जैन यांनी उपचाराचे आव्हान पेलले आणि सलाईन लावली. तोवर पशुकार्यकर्ते स्वप्निल विधानेही मदतीसाठी पोहोचले. दोघेही सुमारे तास भर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. सलाईनमुळे बऱ्याच बेळानंतर पिलाने मान हलविली, सोबतच ते जगण्याची उमेद जागली. वनविभागाच्या ट्रांझिट सेंटरला घटनेची माहिती देण्यात आली. वन विभाकाच्या कर्मचाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत पिलाला ताब्यात घेतले. सध्या ट्रान्झीट सेंटरमध्येचा त्याच्यावर उपचार सुरू आहेत. २४ तास अतिदक्षता महत्त्वाची आहे.
कळपातील माकडांचा गलका
पिलाला शॉक लागल्याने कळपातील अन्य माकडे कासावीस झाली. त्यांचे किंचाळने, गलका सुरू झाला. पिलाजवळ येणाऱ्यांना हे हुसकावून लावत होते. अशा स्थितीत पिलाजवळ पोहोचने फारच कठीन झाले उत्तम व रोनकने हिंमत हरली नाही. धीटपणे त्यांनी पिलाला ताब्यात घेतले. माकडांनी त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, ते अपाय करण्यासाठी नाही तर मदतीसाठी आल्याचे हेरल्यानंतर माकडही काहिसे शांत झाले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.