
नागपूर : "प्राण्यांवर दया करा, प्रेम करा' या अन् अशा अनेक प्रकारचे सुविचार आपण आजवर ऐकत आलोत, वाचत आलोत. मात्र, प्रत्यक्षात ते अमलात आणणारे थोडेच असतात. हाच सुविचार अमलात आणत शहरातील उद्योजक, लेखक राजा भोयर यांनी प्लॅस्टिकच्या डब्यात तोंड अडकलेल्या भटक्या श्वानाचा जीव वाचवला. मन हेलावणारी ही घटना जयताळा रोडवरील प्रसादनगर येथे घडली.
राजा भोयर यांना प्रसादनगर येथील राहत्या घराच्या परिसरामध्ये भटक्या श्वानाच्या विव्हळण्याचा आवाज ऐकायला येत होता. पारा चाळीशीच्या जवळपास असल्याने तहान किंवा भुकेने हे श्वान व्याकुळ झाले असावे, असा प्रथम अंदाज त्यांनी बांधला. मात्र, एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तोंड अडकल्याने ते काढण्याच्या प्रयत्नात असलेले श्वान त्यांच्या नजरेस पडले आणि मग सुरू झाली एका प्राणी प्रेमीची धडपड.
राजा भोयर यांनी सुरुवातीला त्या श्वानाला जवळ बोलावीत त्या वेदनेतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विचित्र संकटात सापडलेले आणि काहीसे भेदरलेले ते श्वान बराच प्रयत्न करून देखील त्यांच्या हाती काही लागेना. परंतु, त्याची ती अवस्था त्यांना स्वस्थ बसू देईना. अशातच एका खाजगी संस्थेच्या संचालिका करिश्मा गिलानी यांच्याकडून भोयर यांना महापालिकेचे पशु पक्षी विभाग प्रमुख डॉ. महल्ले यांचा मोबाईल क्रमांक मिळाला आणि सुरू झाली प्राण्याला त्या वेदनेतून सोडविण्याची धडपड.
महापालिकेच्या पशु रुग्णवाहिकेसह पालिका कर्मचारी राजेश बक्षी, दुर्गेश खरे, विनू शिरकीय, नटवर उसरबारसे, आकाश बेहुनिया, अरविंद चव्हाण, अमोल मेश्राम आदी प्रसादनगर येथे दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्या श्वानाला जाळ्यात पकडून त्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा काही भाग कापला आणि त्याला त्यातून मुक्त केले. लॉकडाउनमुळे शहरातील अनेक भटके प्राणी भेदरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. उन्हाचा पारा वाढत चालल्याने अन्न आणि पाण्याने त्यांची व्याकुळता वाढत चालली आहे.
साधनसामुग्रीसह मनुष्यबळ वाढवावे
सकाळी नऊ वाजता दरम्यान संकटात अडकलेले हे श्वान परिसरात दिसले. सुरुवातीला अनेक प्रयत्न करून देखील महापालिकेच्या योग्य विभागाशी संपर्क होऊ शकत नव्हता. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये संकटात सापडलेल्या अशा प्राण्यांना वाचविण्यासाठी केवळ एकच पशु रुग्णवाहिका आणि चार-पाच कर्मचारी आहेत, हे वास्तव आज समोर आले. प्रशासनाने योग्य साधनसामुग्री मनुष्यबळ वाढवायला हवे.
- राजा भोयर,
उद्योजक आणि लेखक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.