बंगल्यानंतर कार्यालय सुद्धा पाडले, डॉनचे इतवारीतील अस्तित्व संपुष्टात

don santosh ambekar
don santosh ambekar

नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा इतवारीतील हमालपुऱ्यातील बंगला आणि त्याच्या आलिशान कार्यालयावरही बुलडोजर चालवून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. त्यामुळे त्याचे इतवारीतील अस्तित्वच संपुष्टात आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

मंगळवारपासून महापालिकेने त्याचा बंगला पाडण्याची कारवाई सुरू केली. मंगळवारी उरले सुरले बांधकाम पाडण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात बुलडोजर चालविण्यात आला. डॉन आंबेकरचे अलिशान कार्यालय पाडण्यात आले. आंबेकरने तीन प्लॉट एकत्रित करून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे होता. ज्याचे 60.15 चौरस मीटर बांधकाम हे अनधिकृत होते. दुसऱ्या प्लॉटवर 721.56 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम होते. तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या स्व:तच्या नावावर होता. त्याचे 21.30 चौरस मीटर बांधकाम हे देखील अनधिकृत होते. अतिक्रमण विरोधी पथकाने 2 जेसीबी व 1 पोकलेनच्या मदतीने पाडण्याची कारवाई केली.

बंगल्याला "बॉलीवूड' टच
आंबेकरने घरातील बंगल्याचे डिझाईन बॉलीवूडमधील नामांकित नेपथ्यकाराकडून करून घेतले होते. फर्निचरसुद्धा तसेच तयार केले होते. एवढेच नव्हे तर बंगल्याच्या सजावटीसाठी जयपूरवरून कारगिर बोलावले होते. त्यांच्या हातून खास जयपूरी डिझाईन करून घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com