आतातरी जिल्हाप्रमुख लादू नका. निष्ठावंत शिवसैनिक का करत आहेत मागणी जाणून घ्या...

राजेश चरपे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोणाचे वजन मातोश्रीवर चालते त्यानुसार जिल्हा प्रमुख ठरणार आहे. आजवर अशाच नियुक्त्या झाल्या आहेत. त्याचे काय झाले हेसुद्धा समोर आहे. 

नागपूर : मागील दहाबारा वर्षांतील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी काय केले, सध्या कोण सक्रिय आहेत, स्थानिक निवडणुकांमधील त्यांची कामगिरी काय होती? याचा लेखाजोखा घेऊनच नवा प्रमुख नेमण्यात यावा अशी मागणी निष्ठावंतांच्यावतीने केली जात आहे. केवळ मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात आहेत म्हणून जिल्हाप्रमुख लादल्यास शिवसेनेचे वाटोळे होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवेसनेचा आहे. त्यामुळे जनतेला शिवसेनेकडून मोठा अपेक्षा आहेत. जिल्ह्यात एकही आमदार शिवसेनेचा शिल्लक राहिला नाही. महापालिकेत फक्त दोन नगरसेवकांची पार्टी झाली आहे. याला कोण जबाबदार आहेत. कोणाच्या काळात ही अवस्था झाली. पुन्हा त्यांचीच नावे जिल्हाप्रमुखांसाठी चर्चेत असेल आणि त्यांच्याच नावाचा विचार केला जात असेल तर शिवसेनेला काय साध्य होणार, बदल करूनही काय फायदा होईल असाही सवाल शिवसैनिक उपस्थित करीत आहेत. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

सध्या जिल्हा प्रमुख म्हणून मंगेश काशीकर, सूरज गोजे, नितीन तिवारी, शेखर सावरबांधे यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी अनेक जण मुंबईतील नेत्यांचा संपर्कात आहेत. त्यांनी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे कळते. काशीकर यापूर्वी विभाग प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख होते. महापालिकेची निवडणूकही ते जिंकू शकले नाहीत. सावरबांधे सध्या फारसे सक्रिय नाहीत. नितीन तिवारी अलीकडेच शहर प्रमुख झाले आहेत. शिवाय मराठी-अमराठी वाद पुन्हा उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांची दोनच दिवासंपूर्वी शहराचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांचा विषय संपला आहे. विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर हे जाधवांचे पाठीराखे असतानाही त्यांचे पद गोठवले. शहर संपर्क प्रमुख नेमताना त्यांना विश्वासातही घेतले नाही. अशा परिस्थितीत कोणाचे वजन मातोश्रीवर चालते त्यानुसार जिल्हा प्रमुख ठरणार आहे. आजवर अशाच नियुक्त्या झाल्या आहेत. त्याचे काय झाले हेसुद्धा समोर आहे. त्यामुळे आता जिल्हाप्रमुख नेमताना खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't impose district chief