सावधान! ब्युटीपार्लर सुरू करताय? होऊ शकतो कोरोनाचा धोका

beauty
beauty

नागपूर : ब्युटी पार्लर ही नव्या काळाची गरज झाली आहे. कोरोनाच्या भीतीने सध्या हा व्यवसाय बंद असला तरी तो लवकर सुरू व्हावा अशी व्यावसायिक व ग्राहक दोघांनाही घाई झाली आहे. मात्र या व्यवसायात सोशल डिस्टंन्स राखणे अशक्य आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू करण्याची घाई करू नये.
शहरातील काही मोठ्या पार्लर संचालिकांनी व ब्यूटीशियननी नव्या पिढीतील ब्यूटीशियन व ग्राहकांना सध्या पार्लरचे काम सुरू करण्याची घाई करू नका. पार्लरमध्ये सर्वाधिक थेट संपर्क येताे. हा धोका जीवावर बेतू शकेल, अशा शब्दात स्वतःला सांभाळण्याचा सल्ला दिला आहे.
ब्युटीपार्लर व्यवसायात ब्युटीशियनना कोरोना विषाणूचा धोका जास्त असतो; कारण त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क येत असताे. त्यामुळे लॉकडाउननंतर व्यवसाय सुरू झाल्यानंतरही येणारे ग्राहक कोण, कुठले, त्याला कुठले आजार नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. सध्याची परिस्थिती बघता हा व्यवसाय पुढे कसा पार पाडेल, याबाबत ब्युटीपार्लर चालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, स्वार्थी विचार दूर सारून कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ब्युटीशियनला करण्यात आले आहे.                                                                                                                                                 
फेब्रुवारी ते मे हे लग्नसराईचे महिने. या कालावधीत ब्युटीपार्लर पार्लर व्यवसाय तेजीत असतो.  छोट्या व्यावसायिकांपासून मोठे व्यावसायिक या कालावधीत दरमहा 15 ते 50 हजार इतके उत्पन्न मिळवत असतात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच ब्युटीपार्लर व्यावसायिकांना लग्नसराईच्या सिझनला मुकावे लागत आहे. एखाद्या घरात विवाह समारंभ म्हटला, की नववधूपासून सर्वच महिलांना मेकअपचे वेध लागतात.

यात मेंदीपासून हेअर स्पा, बॉडी स्पा, ब्लीचिंग, वॅक्‍सिंग, हेअर कट, हेअर स्टाईल, हेअर कलरिंग, साडी ड्रेपिंग आदींसाठी मेकअप आर्टिस्ट, ब्युटीशिअन यांना खूप मागणी असते. 15 ते 40 हजार रुपयांपर्यंत मॅरेज पॅकेज ठरलेले असतात. मात्र या वर्षी कोरोना विषाणूमुळे ब्युटीपार्लर व्यावसायिकांना खूप मोठा फटका बसला आहे. सध्या त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com