आता गरिबांनाही मिळणार आरोग्य सुविधांचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

गरिबांच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प उभारण्यासाठी येथे एक हजार कोटी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट तसेच हृदयरोग विभागासह 27 विविध विभाग अनुसंधान केंद्रात उभारण्यात येतील. मेयो प्रशासनाला या प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव नव्याने सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
सुमारे 1 हजार कोटीच्या या प्रकल्पात औषधशास्त्र, शल्यक्रिया, हृदयरोग, हृदय शल्यक्रिया, मेंदूरोग, मेंदू शल्यक्रिया मूत्रपिंड, फुप्फुस, बालरोग, बाल शल्यक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घसा विभागासोबत हृदयासह एकूण 27 अतिविशेषोपचाराच्या सोयीसुविधा डॉ. आंबेडकर रुग्णालयात उभारण्यात येतील.

नागपूर : उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र हा विद्यमान पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या स्वप्नातील प्रकल्प. भाजपप्रणित सरकारने या प्रकल्पाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. परंतु, पुन्हा एकदा गरिबांच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प उभारण्यासाठी येथे एक हजार कोटी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट तसेच हृदयरोग विभागासह 27 विविध विभाग अनुसंधान केंद्रात उभारण्यात येतील. मेयो प्रशासनाला या प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव नव्याने सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
सुमारे 1 हजार कोटीच्या या प्रकल्पात औषधशास्त्र, शल्यक्रिया, हृदयरोग, हृदय शल्यक्रिया, मेंदूरोग, मेंदू शल्यक्रिया मूत्रपिंड, फुप्फुस, बालरोग, बाल शल्यक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घसा विभागासोबत हृदयासह एकूण 27 अतिविशेषोपचाराच्या सोयीसुविधा डॉ. आंबेडकर रुग्णालयात उभारण्यात येतील. या विभागात तज्ज्ञ डॉक्‍टरांसह पदव्युत्तरचे अभ्यासक्रमही सुरू केले जाणार आहेत. विशेष असे की, येथील विविध विभागांत अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध केली जाणार आहे. डॉ. नितीन राऊत आघाडी सरकारच्या काळात नागपूरचे पालकमंत्री असताना त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येथे पदव्युत्तर संस्था उभारण्याबाबतचा हा प्रकल्प मंजूर केला होता. परंतु, सत्तांतर झाले आणि हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे 200 खाटांचे चार ते पाच विभाग असलेले रुग्णालय करण्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला. मात्र, येथील पदव्युत्तर संशोधन संस्थेचा प्रकल्प गुंडाळल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, 20 जानेवारीला मुंबईत या विषयावर बैठक घेण्यात आली. त्यात उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये पदव्युत्तर संस्था, ट्रॉमा केअरसह इतरही अद्ययावत सोयी असलेला सुमारे 1 हजार कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुंबईत झालेल्या बैठकीला वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. तात्याराव लहाने, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांच्यासह इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - मेडिकलमध्ये येणारा रोबोट कुठे थांबला?

रुग्णांसाठी ठरणार वरदान
उत्तर नागपुरातील पाच ते सहा लाखावर लोकसंख्या असलेल्या रुग्णांसह भंडारा, गोंदियातील अत्यवस्थ रुग्णांना येथे अद्ययावत वैद्यकीय सेवा तत्काळ मिळू शकतील. तसेच मध्य प्रदेशातील रुग्णांना याचा लाभ मिळेल. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढतील. यामुळे विदर्भातील युवकांनाही याचा लाभ मिळेल. पदव्युत्तर डॉक्‍टरांची संख्या वाढेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ambedkar Hospital for poor people's health in Nagpur