अखेर नागपूर विद्यापीठाला मिळाले नवे प्र-कुलगुरू, डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती

मंगेश गोमासे
Tuesday, 27 October 2020

अखेर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. संजय दुधे यांची निवड करण्यात आली आहे. ते विद्वत परिषदेचे सदस्य देखील आहेत. 

नागपूर - डॉ. संजय दुधे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवे प्र - कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. ते तायवाडे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक असून विद्यापीठ शिक्षण मंडळाशी देखील जुळलेले आहेत.

हेही वाचा -  पानपिंपळीसह मुसळी औषधी वनस्पती नेस्तनाबूत होण्याचा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरूचे पद रिक्त होते. विद्यापीठाचे सेमिस्टर परीक्षेचे निकाल रखडले आहेत. हे निकाल लावण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाते. त्याद्वारे निकालात झालेल्या चुका आणि अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच बोर्ड ऑफ डिन्सच्या बैठकीच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करणे, पेपर सेट करणे आणि इतर कामांचा समावेश असतो. याशिवाय निकाल लावण्याची कामे खोळंबली होती. १२-२०२० च्या दिशानिर्देशानुसार परीक्षेच्या सर्व समित्यांचे अध्यक्ष प्र-कुलगुरू असतात. असे असताना हेच पद रिक्त होते. यासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण असली तरी, सध्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा मंडळ आणि विद्वत परिषदेची बैठक घेणे आवश्यक आहे. मात्र, अधिष्ठाता आणि प्र-कुलगुरू पदावर नेमणूक झाली नसल्याने विद्यापीठासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, आता या सर्व समस्या सुटलेल्या आहेत. अखेर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. संजय दुधे यांची निवड करण्यात आली आहे. ते विद्वत परिषदेचे सदस्य देखील आहेत. 

संपादन - भाग्यश्री राऊत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr sanjay dudhe appointed as new pro vc of nagpur university