नागपूर : सद्या नागपूर शहरातील मेयो, मेडिकल आणि एम्स सोबतच एका खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतात. मेडिकलच्या या कोविड हॉस्पिटलमध्ये दीडशे ते दोनशे बाधित उपचारासाठी दाखल आहेत. याशिवाय सारीच्याही रुग्णांसाठी येथे स्वतंत्र वॉर्ड आहे.
सारीच्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना इतरत्र हलवले जाते. मात्र अनेक सारीचे रुग्ण कोरोनाबाधित आढळून येतात. याशिवाय बाहेर कोरोनाबाधित रुग्ण ये-जा करीत असतात. अनेकांना सर्दी असते, शिंका येतात, खोकलताना दिसतात. बाधिताच्या शिंकण्या- खोकल्यातून विषाणूचे संक्रमण झपाट्याने होते. त्यामुळे येथील प्रवेशद्वारावर रुग्णांच्या बेडशीट धूवून त्या वाळत घालणे अतिशय गंभीर बाब आहे. बेडशीट धूत असताना त्यांचे निर्जुंतुकीकरण केले जाते. मात्र पुन्हा त्या अशाप्रकारे वाळत घालणे म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढवणे आहे.
बेडशीट सारीच्या रुग्णांसाठी वापरल्यास त्यातूनही कोरोनाचे संक्रमण शक्य असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. कोविड हॉस्पिटलच्या रेलींगवर बेटशीट वाळत असल्याचा प्रकार मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या निदर्शनात आला. यानंतर मात्र तातडीने सर्व बेटशीट रेलींगवरून काढण्यात आल्या. त्या बेडशीट पुन्हा निर्जुंतुकीकरण करण्यात आल्यानंतर सुरक्षीत ठिकाणीच वाळत घालण्यात आल्याची माहिती आहे.
कर्मचाऱ्यांचे समूपदेश
या प्रकारानंतर येथील दोन कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. लहानशा चुकीमुळे कोरोनाचा संसर्ग कशा पसरू शकतो, याची माहिती या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वैद्यकीय अधिक्षक कार्यालयाने तत्काळ घटनेचे गांभिर्य लक्षात घेतल्याने पुढे सुरक्षित ठिकाणी बेडशीट वाळत घातल्या. हा धोका लक्षात घेत मेडिकलमधील धोबीघाटावर कोरोनाबाधितांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी पाठवण्यात येत नाही. प्रत्येक कोरोना वॉर्डासह कोरोना हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वाशिंग मशीन लावण्यात आल्या आहेत.
बेडशीटमधून संक्रमणाचा धोका
मेडिकलशी संलग्न "कोविड हॉस्पिटल'मधील कोरोना तसेच सारी वॉर्डातील रुग्णांच्या खाटेवरील बेडशीट चक्क प्रवेशद्वारावर वाळत घातल्याचा प्रकार पुढे आला. मंगळवारी कोविड हॉस्पिटलला चक्क धोबीघाटाचे स्वरूप आल्याचे चित्र नजरेला दिसत होते. या बेडशीटमधून संक्रमणाचा धोका कोणाला जबाबदार धरायचे असा सवाल नातेवाईकांनी केला.
(संपादन : प्रशांत राॅय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.