कोरोनाचे तांडव सुरुच! उपराजधानीतील आणखी `हे` परिसर करण्यात आले सील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

नेहरुनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 28 येथील न्यु गाडगे बाबानगर या प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यात आली. 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत असून आज यात परिसराची भर पडली. रेशीमबाग, आशिर्वादनगर, बिनाकी, लोधीपुरा, प्रेमनगर, नरसाळा, महात्मा फुलेनगर परिसरात कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे या वस्त्यांतील काही परिसर सील करण्यात आला. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

नेहरुनगर झोनअंतर्गत प्रभाग 30 मधील आर्शिवादनगराच्या पूर्वेस नंदकिशोर ठोंबरे यांचे घर, पश्‍चिमेस मुश्‍ताख शेख यांचे घर, उत्तरेस प्रमोद गोजे यांचे घर, दक्षिणेस रमेशलाल शाह यांचे घरापर्यंतचा परिसर सिल करण्यात आला. गांधीबाग झोनअंतर्गत प्रभाग 19 येथील लोधीपुरा, हजहाऊसच्या दक्षिण-पूर्वेस हज हाऊस, उत्तर-पूर्वेस शेख यूनस अब्दुल रज्जाक, उत्तर-पश्‍चिमेस जीएनएस फ्यईनर एजेंन्सी, दक्षिण-पश्‍चिमेस विकास आटो एजेंन्सीपर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले.

हनुमाननगर झोनअंतर्गत प्रभाग 31 मधील रेशिमबाग येथील उत्तरेस अंबादास मेहता यांचे घर ते पुष्पांजली अपार्टमेंट, पूर्वेस पुष्पांजली अपार्टंमेंट ते वराडे यांचे घर, दक्षिणेस वराडे ते संघ कार्यालय गेट, पश्‍चिमेस संघ कार्यालय गेट ते अंबादास मेहता यांचे घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले.

याच झोनअंतर्गत प्रभाग 34 मधील महात्मा फुलेनगरातील उत्तरेस कोरडे ते अंतुरकर यांचे घर, पूर्वेस अंतुरकर ते हिवसे यांचे घर, दक्षिणेस हिवसे, पश्‍चिमेस कोरडे यांचे घरापर्यंतचा परिसर तर याच प्रभागातील भोले बाबानगर उत्तरेस वैष्णोधाम अपार्टमेंट ते प्लॉट क्रमांक 365, पूर्वेस प्लॉट क्रमांक 354 ते 362 ते रेणुका मॉं किराणा, दक्षिणेस रेणुका मॉं किराणा ते बाजारे यांचा प्लॉट तर पश्‍चिमेस बाजारे प्लॉट ते वैष्णोधाम अपार्टमेंटपर्यंतचा परिसर सिल करण्यात आला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

प्रभाग क्रमांक 29 येथील नरसाळ्यातील निलकमलनगराच्या दक्षिण-पूर्वेस विलास पाटील यांचे प्लॉट, दक्षिण-पश्‍चिमेस सुरेश वानखेडे यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस प्रमिला मांडवकर यांचे घर, उत्तर-पूर्वेस नरेश रामटेके यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला. सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग 21 मधील प्रेमनगर झेंडा चौकाच्या उत्तर-पूर्वेस अजाबरावजी वांदे यांचे घर , दक्षिण-पूर्वेस किर्ती भाजपीय यांचे घर, दक्षिण-पश्‍चिमेस एम.मोतेवार यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस राहुल उमरेडकर यांचे घरापर्यंतचा परिसर सिल करण्यात आला.

याच झोनअंतर्गत प्रभाग 5 मधील मेहंदीबाग रोड, बिनाकी येथे उत्तर-पूर्वेस रोकडे यांचे घर, पूर्वेस बंटी धुर्वे यांचे घर, पूर्वेस वाकोडीकर यांचे घर, दक्षिण-पूर्वेस सरोदे फ्रेम वर्क, पश्‍चिमेस हिरणवार व शिव मंदिर, उत्तरेस ताज पान पॅलेसपर्यंत निर्बंध घालण्यात आले. नेहरुनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 28 येथील न्यु गाडगे बाबानगर या प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to kovid-19 some part of reshimbagh, ashirvadnagar, narsala seal