esakal | लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी; डॉक्टर कानेटकरांनी सांगितलं यामागील कारण   
sakal

बोलून बातमी शोधा

Due to this reason amount corona virus in children is less

बालरोग तज्ज्ञांच्या ई- नॅपकॉन परिषदेत त्या बोलत होत्या. डॉ. कानेटकर या प्रधानमंत्री कार्यालयातील आरोग्य विषयक सल्लागार परिषदेवर आहेत. डॉ. कानेटकर म्हणाल्या,

लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी; डॉक्टर कानेटकरांनी सांगितलं यामागील कारण   

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः कोरोनाबाधितांबाबत सरकारने वेळीच योग्य उपाययोजना आणि उपचाराची दिशा ठरवली. यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचे दुष्परिणामही कमी आढळून आले आहेत, असे मत लेफ्टनण्ट जनरल तसेच बालरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी कानेटकर यांनी व्यक्त केले.

बालरोग तज्ज्ञांच्या ई- नॅपकॉन परिषदेत त्या बोलत होत्या. डॉ. कानेटकर या प्रधानमंत्री कार्यालयातील आरोग्य विषयक सल्लागार परिषदेवर आहेत. डॉ. कानेटकर म्हणाल्या, भारतात वेळीच टाळेबंदी लावण्यात आली. तातडीने बाधितांवर उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. त्यामुळे कोरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

अधिक माहितीसाठी - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

डॉ. उमा अली म्हणाल्या, औषधांचा अतिरेकी वापर केल्यास मुलांना किडणीचे आजार होण्याचा धोका आहे.त्यामुळे मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणे योग्य नाही. मुंबईच्या डॉ. तनू सिंघल, इंग्लंडच्या डॉ. रमनन, मुंबई, डॉ. कॅनिला रॉड्रिक्स यांनीही मुलांच्या कोरोनाशी विषयांवर प्रकाश टाकला. मुलांची किडनी, त्वचा, अस्थी, डोळे, ह्रदय, मेंदूशी संबंधित आजारांवरही चर्चासत्रातून विचार मंथन झाले. 

अमेरिकेचे डॉ. झुबेर, केरळचे डॉ. नवीन जैन यांनी कमी वजनाच्या जन्मणाऱ्या बाळांच्या आजारावर लक्ष वेधले. या मुलांची वेळीच आवश्यक काळजी घेतल्यास अपंगत्वाची जोखीम टाळणे शक्य आहे, असे ते म्हणाले.

डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर डॉ. हरीष शेट्टी यांनी तर डॉ. विभा कृष्णमुर्ती, डॉ. रश्मी परवार, डॉ. तुटेजा, डॉ. उदय बोधनकर यांनीही वेगवेगळ्या विषयावर मत मांडले. परिषदेच्या यशस्वितेसाठी बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या डॉ. शुभदा खिरवडकर, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले..

वाचा सविस्तर-  प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

मनोरंजनासाठी सर्वच वयोगटातील व्यक्तींनी मोबाईल, टिव्ही बघण्याशिवाय दुसरे कोणतेच काम करीत नव्हते. मुलांना शिक्षणाचा ऑनलाइन वापर होत आहे.मोबाईल वापराचा अतिरेक झाला होत आहे. यामुळे अनेकांमध्ये निद्रा विकार बळावले.
-डॉ. महेश बाबू, सिंगापूर

संपादन - अथर्व महांकाळ