
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात चैतन्य येईल असे वाटले होते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त ५० ते ५५ टक्के म्हणजे अंदाजे २५० कोटीचा व्यवसाय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात सराफा बाजारात वगळता वाहन, फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बांधकाम क्षेत्रात खरेदीचा उत्साह कमी होता असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दसऱ्याला बाजारात गर्दी दिसली नसली तरी व्यवसायाला बुस्ट मिळालेला आहे. ग्राहकांचा फेस्टिवल मुड तयार झालेला आहे. एक तारखेनंतर नोकरदार वर्गाचा पगार झाल्यानंतर बाजारात खऱ्या अर्थाने रौनक वाढेल अशी आशा आहे. तसे चित्रही दिसू लागले आहे. दसरा ही त्याची नांदी होती असे मत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केले.
दसऱ्यांच्या निमित्ताने खरेदीसाठी ग्राहक बाजारात येऊ लागल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपडा व्यवसायात ३० टक्के घट झालेली आहे. ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. सहा महिन्यापासून ग्राहकांनी गरजेच्या वस्तू सोडून काहीही खरेदी केलेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहक बंपर खरेदी करतील अशी अपेक्षा आहे असे मत होलसेल क्लॉथ ॲण्ड यार्न मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी सांगितले.
कंपनीला कोणतीही सूचना न देता उघडली स्वतःची एजन्सी; केला अठरा लाखांचा अपहार
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माजी अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, कोरोनामुळे बाजारात गेल्या सात महिन्यापासून मरगळ आली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर ती झटकली गेली असली तरी सात महिन्याचा खरेदीचा अनुशेष अद्यापही बाकी आहे. अद्यापही ग्राहक गांधी बाग, इतवारी आदी बाजारपेठेत जाण्यास घाबरत आहे. त्यामुळे यंदा ऑनलाईन खरेदी वाढलेली आहे. सोने आणि चांदीच्या किमती घसरल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी केली होती. सामाजिक अंतर पाळण्यासाठी यंदा दसऱ्याच्या दिवशी खरेदी करण्याऐवजी त्यापूर्वीचं बुकिंग करण्याचा नवा ट्रेंड दिसून आला आहे. काही जणांनी लग्नासाठी व धनतेरससाठीही दागिन्यांचे बुकींग सुरू केलेले आहे, असे रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे म्हणाले.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाच्या मुलाचे अपहरण; अपहृत मुलाच प्रसंगावधान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टॅम्प ड्युटीमध्ये घट केल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर बांधकाम क्षेत्राला बुस्ट मिळेल असे वाटत होते. मात्र, खासगी क्षेत्रातील नोकरदारांचा कमी झालेला पगार, बाजारातील अस्थिरतेमुळे अल्प प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी खरेदीसाठी चौकशी करणे सुरू केलेले आहे. हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. या क्षेत्रासाठी दिवाळीत पोषक वातावरण राहील अशी अपेक्षा आहे, असे मत महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.