आता कानाची शस्त्रक्रिया शिकणे होणार सुलभ, 'टेम्पोरल बोन' ठरणार वरदान

मंगेश गोमासे
Monday, 18 January 2021

आज थ्रीडी प्रिंटींगचे युग आहे. मानवी शरीरातील क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असणारे हाड म्हणजे कानाचे हाड, ज्याला 'टेम्पोरल बोन' असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया करताना ती अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते.

नागपूर : कानाची व कानातून जाणाऱ्या मार्गाने मेंदूच्या अनेक शस्त्रक्रिया शिकण्यासाठी या 'टेम्पोरल बोन'वर सराव करावा लागतो. वैद्यकीय महाविद्यालयात अ‌ॅनॉटॉमी विभागातच असे बोन मिळू शकतात. हे 'टेम्पोरल बोन'थ्रीडी प्रिंट करण्याची संकल्पना कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईक यांनी मांडली. त्यांच्या या संकल्पनेला विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील प्राध्यापक आणि एम.टेक.च्या विद्यार्थ्याने मूर्त रुप दिले आहे. त्यामुळे आता गुंतागुंतीची असणारी कानाची शस्त्रक्रिया शिकणे सुलभ होणार आहे. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

आज थ्रीडी प्रिंटींगचे युग आहे. मानवी शरीरातील क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असणारे हाड म्हणजे कानाचे हाड, ज्याला 'टेम्पोरल बोन' असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया करताना ती अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. अशावेळी शस्त्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्या आणि धमन्यांना कुठलाही धक्का लागू नये यासाठी त्याचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य असते. मात्र, त्यासाठी बाजारात असलेल्या अनेक प्लास्टिक वा शोचे मॉडेल उपलब्ध असतात. त्यातून शस्त्रक्रियेदरम्‍यान प्रत्येक बाब लक्षात येताना दिसून येत नाही. ही बाब प्रकर्षाने लक्षात घेत कान, नाक, घसा तज्ञ्ज डॉ.प्रशांत नाईक यांनी 'टेम्पोरल बोन'थ्रीडी प्रिंट करण्याची संकल्पना मांडली. ‍व्हीएनआयटीच्या यांत्रिकी (मेकॅनिकल ) विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. रश्मी उद्दनवाडीकर आणि जबलपूर येथील एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलला पियुष उके यांनी साकार केले. जवळपास दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने थ्रीडी 'टेम्पोरल बोन'तयार करण्यास यश आले. त्यातून कानाच्या प्रतिकृतीतील सर्व बारकाव्यांमुळे व त्याच्या किफायशीर उपलब्धतेमुळे शस्त्रक्रिया शिकणे शक्य झाले आहे. सध्या अशा व या प्रकारच्या इतर थ्रीडी 'प्रिंटेड बोन्सची निर्मिती न्यू ओसा' या नावाने नोंदणी झालेल्या कंपनीद्वारे होत आहे. व्‍हीएनआयटीच्या इनक्युबेशन सेंटर येथे स्टार्टअप केंद्र असणाऱ्या न्यू ओसा मेडिक्विप प्रा.लि. कंपनीच्या संचालकपदी डॉ. सुभाष लुले, डॉ. प्रशांत नाईक, डॉ. शशांक लुले, पियुष उके आणि संस्थापक सल्लागार डॉ. रश्मी उद्दनवाडीकर यांचा समावेश आहे. या कंपनीच्या माध्यमातून आज दुबई आणि बोस्टन मेडिकल सेंटर येथेही हे उत्पादन पाठविण्यात आले आहे. याशिवाय शहरातील बऱ्याच डॉक्टरांना ते उपयोगी पडत आहे. 

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

बीआयआरएसीकडून ५० लाखांचा निधी - 
डॉ. प्रशांत नाईक यांनी 'टेम्पोरल बोन'वर आधारित संकल्पनेला बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलतर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून या उत्पादनाचे व्यावसायीकीकरण करण्यास मदत होणार आहे. 

शरीरातील क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असणारे हाड म्हणजे कानाचे हाड आहे. मात्र, या बोनमुळे त्यावर शस्त्रक्रिया करता येणे शिकणे सोपे होईल. याशिवाय आज या बोन 'कॉकलिअर इन्प्लान्ट' शस्त्रक्रियाही शिकता येणे शक्य आहे. 
- डॉ. प्रशांत नाईक, कान, नाक, घसा तज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ear surgery is easy to learn due to temporal bone 3d print in nagpur