edible oil and rice rate increases
edible oil and rice rate increases

खाद्य तेलासह तांदळाचे भाव भिडले गगनाला; दोन-तीन महिन्यापर्यंत दरवाढ राहणार कायम

Published on

नागपूर : धानाचा उतारा कमी असल्याने प्रति क्लिंटल एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे. खाद्य तेलांच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झालेली आहे. शेंगदाणे तेलाचे भाव स्थिरावलेले आहेत. दोन ते तीन महिने तेलाचे दर चढ्याच स्थितीत राहतील. तूर, हरभरा डाळीचे भाव स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

होळीपर्यंत जुन्या तांदळाची मागणी वाढत असल्याने ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भाव घसरतील, असे बोलले जात होते. मात्र, धान पोचट असून त्याचा उतारा कमी असल्याने भाव वधारले आहेत. खाद्य तेल आणि तांदळाच्या भाववाढीने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. भारतातील ७० टक्के खाद्य तेल विदेशातून आयात केले जाते. तर, ३० टक्के उत्पादन देशातच केले जाते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे खाद्य तेलाची आयात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने पाम तेलावर आयात शुल्कातही वाढ केली आहे. भारतात सोयाबीन पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम तेल उत्पादनालाही झालेला आहे. पंधरा दिवसांपूर्वी १५ लिटर तेलाची किंमत १८००-२१३० रुपयांदरम्यान होते. आता खाद्य तेलाचे भाव २००० ते २३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात सोयाबीन तेल १३५ ते १४० रुपये किलो तर शेंगदाणा तेल १६० ते १७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. 

तांदळाचा उतारा कमी असल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे तांदळाच्या भावात प्रति किलो दहा रुपयांची वाढ झालेली आहे. एचएमटी ४ हजार, श्रीराम तांदूळ साडेचार हजार ते पाच हजार २०० रुपयांवरून प्रति क्विंटल रुपयावर तर चिन्नोर साडेपाच ते ५ हजार सातशे रुपयांवर पोहोचला आहे. सर्वच डाळींच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. 
-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com