esakal | टाळेबंदीत गृहिणींसाठी आली ही आनंदाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Edible oil prices reduced by 10%

चीनसह इतरही देशांत मागणी कमी झाल्याने स्वदेशी बाजारातही दर कमी होऊ लागले आहेत. यामुळे ग्राहकांनासुद्धा फायदा होऊ लागला आहे.

टाळेबंदीत गृहिणींसाठी आली ही आनंदाची बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कोरोना विषाणूने जगात थैमान घातल्याने खाद्यतेलाचे दर 10 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. जागतिक किमतीचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम पडत असतो, त्याचे हे द्योतक आहे.

एका वर्षात देशात वापरलेल्या जाणाऱ्या एकूण तेलापैकी 235 लाख टन खाद्य तेलाच्या जवळपास 70 टक्के तेल आयात केले जाते. चीन खाद्य तेलाचा एक मोठा ग्राहक आहे. चीनसह इतरही देशांत मागणी कमी झाल्याने स्वदेशी बाजारातही दर कमी होऊ लागले आहेत. यामुळे ग्राहकांनासुद्धा फायदा होऊ लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनेक वस्तूंच्या किमती वाढत असताना खाद्य तेलाचे दरात घसरण झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

लाॅकडाउनमुळे प्रियकरांना विरह काही सहन होईना म्हणून मुली घेताहेत असा निर्णय...

पुढील आठवड्यात ब्रांडेड कुकिंग ऑइलच्या पॅकेटवर छापलेल्या किमतीत हे दिसेल. पाम तेल आणि सोयाबीन तेलासाठी ग्राहकांना 10 टक्के म्हणजे लिटरमागे 8 रुपये कमी द्यावे लागत आहेत. सोयाबीन आणि पाम तेलाची किंमत ही घाऊक बाजारात 85 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर सूर्यफूल तेलाची किंमत 83 रुपये प्रतिलिटर आहे.


टाळेबंदीमुळे तेलाच्या रिफायनरी बंद असल्याने मार्च महिन्यात खाद्य तेलाचे भाव आकाशाला भिडले होते. त्यात तेलाची मागणी कमी झाल्याने भावात घसरण होऊ लागली होती.

मागणी घटल्याने पामोलिन आणि वनस्पती डालड्याच्या किमतीत गेल्या 20 दिवसांत 250 रुपये प्रतिडबा घसरण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 15 किलो डब्यातील तेलाचे भाव 1400 ते 1450 रुपये पोहोचले होते. आता तो दर 1280 ते 1300 रुपयांवर आला आहे. सोयाबीन तेलाचे (15 किलो) भावही घाऊक बाजारात 1600 ते 1650 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता आवक वाढल्याने आणि मागणी कमी झाल्याने प्रति डब्बा 200 रुपयांची घसरण झाली असून ते 1375 ते 1400 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
 

भूख, प्यास की चिंता नही, बस गाव जाना हैं

मागणी घटल्याने दर कमी
साठा करणाऱ्या ग्राहकांची खरेदी कमी झाली आणि वाटप करणाऱ्या संस्थांकडूनही मागणी घटल्याने तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. तमिळनाडू आणि गुजरातसारख्या लांबवर असलेल्या राज्यातील तेलाची आवक कमी झालेली आहे. त्यामुळेही फल्ली तेलाचे भावात वाढ झालेली आहे. काही दिवसांत फल्ली तेलाचे भाव कमी होण्याची शक्‍यता कमीच असून, ती वाढेल.
-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा संघ

go to top