
निलांबरी यांच्या एकूणच वागण्यामुळे घरच्यांसह डॉक्टरांनीही त्यांना वेडात काढले आहे. कुणी त्यांची टिंगल उडविली, तर कुणी खोटे ठरविले आहे. मेंदूला शॉकही देण्यात आला. पण निलांबरी यांनी त्याची पर्वा केली नाही. कुणी कितीही निंदा केली तरीही मी समाजसेवेचे काम सुरूच ठेवणार आहे.
नागपूर : शिवांभू अर्थात स्वमूत्राचे नियमितपणे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढून कोरोनासह अनेक दुर्धर आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असा दावा मसाजतज्ज्ञ व नाडी वैद्य निलांबरी अभ्यंकर यांनी केला आहे.
जयताळा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय निलांबरी म्हणाल्या, स्वमूत्र आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. दुर्दैवाने हा प्रकार किळसवाणा वाटत असल्यामुळे अनेक लोक इच्छा असूनही मूत्र सेवन करीत नाहीत. दररोज मध्यरात्री १२ ते २ या वेळेत लहान मुलांनी स्वतःचे एक चम्मच आणि मोठ्यांनी दोन चम्मच मूत्र पिल्यास आरोग्य चांगले राहाते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते व शांत झोपसुद्धा लागते. कोरोनासारख्या आजारांवरदेखील मात करता येऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
मी गेल्या कित्येक वर्षांपासून स्वमूत्र सेवन करीत आहे. त्यामुळेच माझी प्रकृती ठणठणीत आहे. कोणतेही औषध घेतले नाही किंवा डॉक्टरकडेसुद्धा गेली नाही. इतकेच नव्हे तर मोतीबिंदू गळून पडल्याचे व या वयातही दात आल्याचे त्यांनी सांगितले. मुळात नाडीवैद्य असलेल्या निलांबरी गेल्या ३० वर्षांपासून विशिष्ट टेक्निकचा वापर करून रुग्णांवर मसाज करीत आहेत.
एक ते दीड महिना नियमित मसाज व नाडी उपचार केल्यास नसा मोकळ्या व वेदना दूर होऊन हलके वाटते. त्यामुळे अर्धांगवायू, अर्ध डोकेदुखी (मायग्रेन), सांधेदुखी, पोटदुखी, अपचन, सायटिका, अपंगत्व व मतिमंदत्वासारखे आजार बरे होऊ शकतात.
क्लिक करा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती
निलांबरी यांच्या एकूणच वागण्यामुळे घरच्यांसह डॉक्टरांनीही त्यांना वेडात काढले आहे. कुणी त्यांची टिंगल उडविली, तर कुणी खोटे ठरविले आहे. मेंदूला शॉकही देण्यात आला. पण निलांबरी यांनी त्याची पर्वा केली नाही. कुणी कितीही निंदा केली तरीही मी समाजसेवेचे काम सुरूच ठेवणार आहे. विश्वास बसल्याने आता घरच्यांचाही पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे त्यांनी यांनी सांगितले.
निलांबरी यांना आयुष्यात खूप कष्ट सहन करावे लागले. उदरनिर्वाहासाठी कधी मुलांची ट्युशन घेतली, कधी टायपिस्ट म्हणून काम केले. कधी साड्या विकल्या, तर कधी झाडूकाम केले. रेल्वे स्टेशनवरसुद्धा अनेक रात्र काढाव्या लागल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा, अशी निलांबरी यांची इच्छा आहे. डॉक्टरांना संशोधनासाठी आवश्यकता असल्यास माझी देहदानाचीही तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.
संपादन - नीलेश डाखोरे