नागपूर कोविड : बाधितांचा आकडा पोहोचला सव्वा सातशेवर तर मृतांची संख्या पंधरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येने चांगलाच वेग पकडला आहे. रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असतानाच मृतांचा आकडाही वाढायला सुरुवात झाली आहे. आता रुग्ण आणि मृत्यूचा हे दररोज होत आहेत. मागील दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांचा आकडा 726 वर पोहोचला आहे. 

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत वाढत असतानाच मृत्युसत्र मागील तीन दिवसांपासून सुरूच आहे. सोमवारी नागपूर शहरात हंसापुरी येथील 42 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 15 वर गेला. सोमवारी गर्भवतीसह आणखी नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान मेडिकल आणि मेयोतील प्रयोगशाळेतून पुढे आले होते. मंगळवारचा दिवस उजळत नाही तोच शहरात आठ कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे कोरोनाची संख्या 726 वर पोहोचली आहे. 

मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमधील चार जून रोजी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यानंतर रविवार सात जून रोजी "सारी' आजारासह कोरोनाच्या बाधेने 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. लगेच सोमवार 8 जून रोजी आणखी एका 42 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये झाला. एक जून रोजी या व्यक्तीला मेयोत दाखल करण्यात आले. 2 जून रोजी कोरोनाबाधित असल्याचे आढळले.

क्लिक करा - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

हंसापुरी येथील शेख बारी चौकातील रहिवासी असून त्याला हिमोडायलिसिस सुरू होते. किडनी निकामी झाल्यामुळे त्याचे जगणे डायलिसिसवरच होते. कोरोनाची बाधा झाल्याने श्‍वास घेण्यास त्रास होत होता. याशिवाय रक्तदाबही असल्याची नोंद केसपेपरवर आहे. प्रकृती गंभीर होताच त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर तीन दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येने चांगलाच वेग पकडला आहे. रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असतानाच मृतांचा आकडाही वाढायला सुरुवात झाली आहे. आता रुग्ण आणि मृत्यूचा हे दररोज होत आहेत. मागील दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांचा आकडा 726 वर पोहोचला आहे.

अधिक माहितीसाठी - मोठी बातमी : रस्त्यांवर उद्यापासून दिसणार हा बदल...जाणून घ्या संपूर्ण माहिती
 

एम्स, मेयोतून 15 जण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचा आकड्यातही वाढ होत आहे. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचा टक्का गतीने वाढत आहे. एम्समधून अकरा वर्षाच्या चिमुकल्यासह 5 जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय मेयोतून 8, अशा 13 जणांनी कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध जिंकले आहे. यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. ते ठणठणीत बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. विशेष असे की, सोमवार 8 जून रोजी सुटी झालेल्यांमध्ये मेयोत दाखल असलेल्या नाईक तलाव परिसरातील दीड वर्ष, साडेसात, साडेआठ वर्षांच्या मुलींसह 11 वर्षाच्या मुलाने कोरोनावर मात केली आहे. याशिवाय मेयोतील पाच वर्षांच्या मुलासह पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight patients were found in Nagpur on Tuesday