कोरोना ब्रेकिंग : नागपूर लवकरच गाठणार हजारचा पल्ला; बाधितांची संख्या पोहोचली 960वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

बुधवारी एकाच दिवशी 86 व गुरुवारी 58 कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे शुक्रवारी आणखी किती रुग्ण वाढतात याबाबत अनेकजण चिंता व्यक्त करीत होते. मात्र, केवळ 18 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासनाला थोडा का होईना दिलासा मिळाला होता.

नागपूर : गेली दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे शुक्रवारी शहराच्या विविध भागांत तसेच ग्रामीण भागातील 18 रुग्ण आढळून आले होते. शनिवारी यात अकरा रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपराजधानीतील कोरोनाबाधितांची संख्या 960 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी निकालस मंदिर व भोईपुरा या नव्या भागात कोरोनाने प्रवेश केला होता. येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने या भागात खळबळ माजली. 

बुधवारी एकाच दिवशी 86 व गुरुवारी 58 कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे शुक्रवारी आणखी किती रुग्ण वाढतात याबाबत अनेकजण चिंता व्यक्त करीत होते. मात्र, केवळ 18 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासनाला थोडा का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी अकरा रुग्ण आढळून आल्याने पुन्हा प्रशासनाची चिंता वाढली. कालपर्यंत 939 असलेली रुग्ण संख्या आज 960वर जाऊन पोहोचली आहे.

क्लिक करा - रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

काल भोईपुरा व निकालस मंदिर या नव्या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. मेयो रुग्णालयात तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी नऊ जणांना कोरोनाचे निदान झाले. यातील तिघे ग्रामीण भागातील रिधोरा व काटोल येथील आहेत. इतर सहा जणापैकी दोघे चंद्रमणीनगरातील असून, हबीबनगर, निकालस मंदिर, मोमिनपुरा, कोराडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

एम्समधून दोन नमुने पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमधून आलेल्या अहवालातून तिघांना कोरोनाचे निदान झाले. मेडिकलमधील लॅबमधून आलेल्या अहवालात अकोल्याच्या एकाला कोरोना असल्याचे पुढे आले. आमदार निवास विलगीकरण केंद्रातील नागरिकांचे नमुने वेटरनरी लॅबमध्ये तपासण्यात आले. यात तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यात सावनेर, मोमिनपुरा, बांगलादेशचा प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एका खासगी लॅबमधून आलेल्या अहवालात अमरावतीचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

लवकरच गाठणार हजारचा पल्ला

नागपुरात मागील सात दिवसांपासून ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यावरून नागपूर लवकरच एक हजाराचा पल्ला गाठेल यात शंका नाही. शनिवारी आढळून आलेल्या अकरा रुग्णांमुळे बाधितांचा आकडा 960 वर पोहोचला आहे. यात आणखी 40 रुग्णांची भर पडताच हजारचा पल्ला पूर्ण होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven corona patients found infected in Nagpur on Saturday