esakal | महत्त्वाची बातमी! दोन लसीकरणानंतरही शरीरात तयार होत नाहीये अँटीबॉडीजची निर्मिती; तपासातून पुढे आली महिती
sakal

बोलून बातमी शोधा

Even after two vaccinations the body does not produce antibodies Nagpur corona vaccine news

कोरोना व्हायरसचा प्रसार सध्या वेगाने होतोय. सध्या बहुतांश लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात येण्याची भीती आहे. लसीकरणातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीरात आलेल्या व्हायरसचा नायनाट होतो. यामुळेच लसीकरण महत्त्वाचे आहे. लस टोचली आहे तो कधीच आजारीच पडत नाही असे नाही.

महत्त्वाची बातमी! दोन लसीकरणानंतरही शरीरात तयार होत नाहीये अँटीबॉडीजची निर्मिती; तपासातून पुढे आली महिती

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधात लढताना अल्पकाळात लस तयार केली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन तयार झाल्यानंतर लसीकरण सुरू झाले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. यानंतर रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती सुरू होते. मात्र, लस घेतल्यानंतर महिना दीड महिना लोटून गेल्यानंतरही काहींच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती झाली नसल्याची माहिती तपासणीतून पुढे आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फ्रन्ट लाईन वर्करपासून तर डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात लस घेतली. लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि मग शरीरात कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेत शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती सुरू होते.

"माझं बाळ मला परत द्या हो"; दीपाली चव्हाणच्या आईचा टाहो; उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी

या प्रक्रियेदरम्यान टी सेलही कार्यरत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात. याशिवाय पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी शरीराची तयारी असते. मात्र, मात्र काही लोकांच्या शरीरात ही अँटीबॉडीजची निर्मिती होत नसल्याचे दिसून आले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार सध्या वेगाने होतोय. सध्या बहुतांश लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात येण्याची भीती आहे. लसीकरणातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीरात आलेल्या व्हायरसचा नायनाट होतो. यामुळेच लसीकरण महत्त्वाचे आहे. लस टोचली आहे तो कधीच आजारीच पडत नाही असे नाही.

कोव्हॅक्सिन असो की, कोविशिल्ड लस कोरोना उच्चाटनासाठी संजीवनी ठरणार आहे. अँटिबॉडीज प्रक्रिया वाढवण्यासाठी अ‍ॅडजव्हंट हा घटक लसीमध्ये असतो, यामुळे प्रत्येकाच्या शरीरातील क्षमतेप्रमाणेत अँटिबॉडीज निश्चित तयार होतील, असेही मेडिकलच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.

जाणून घ्या - किन्नर उत्तमबाबावर कारागृहात सामूहिक अत्याचार; आईला फोनवर सांगितली माहिती

काही संशोधन सुरू असल्याची माहिती

पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्यात येतो. लसीचा परिणाम दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी निश्चित होतो. मात्र, लस घेतल्यानंतर पंधरा दिवसानंतर अँटिबॉडीज तपासल्या. माझ्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या नाहीत. यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर काही संशोधन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे, असे मेडिकलच्या विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर म्हणाले.

मतदान केंद्राच्या धर्तीवर लसीकरण व्हावे
दुसऱ्या डोसनंतर प्रत्येकाच्या शरीरातील रिॲक्शननुसार अँटिबॉडीज तयार होतात. काही वेळात सहा आठवडेही कालावधी लागू शकतो. कोरोना प्रतिबंधक लसीकरण आपत्कालीन काळात सुरू झाले आहे. यामुळे अँटिबॉडीज किती दिवसात तयार होतात, यासंदर्भात प्रमाणित असे संशोधन अद्याप झाले नाही. मात्र लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मतदान केंद्राच्या धर्तीवर लसीकरण व्हावे. 
- डॉ. प्रशांत पाटील,
विभागप्रमुख, मेडिसीन, मेडिकल, नागपूर

go to top