कोरोना संकटकाळातही टपाल विभागाने पोचविल्या लाखो बहिणींच्या राख्या

मनीषा मोहोड
Thursday, 6 August 2020

बहिणीची राखी भावापर्यंत पोचविण्याचे काम राखी स्पेशल लेटर बॉक्सच्या माध्यमातून पार पाडले.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बहीण-भावाचे अतूट नाते जपणारा रक्षांबधन सण साजरा करण्यातदेखील अडचणी आल्या. त्यामुळे अनेक बहिणींनी पाठवलेल्या राख्या वेळेत भावांपर्यंत पोचवण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी कंबर कसली.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

अगदी रविवारीही देखील कामावर हजर राहून राख्या पोचवण्याचे काम त्यांनी केले. विशेष म्हणजे अपूर्ण पत्ते असलेल्या राख्याही पोचवण्याची मेहनत त्यांनी आनंदाने घेतली. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

कोरोनामुळे यंदा बहिणींना राखी बांधण्यासाठी भावाकडे जाता आले नाही. परंतु, टपाल विभागाने रक्षाबंधनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत, बहिणीची राखी भावापर्यंत पोचविण्याचे काम राखी स्पेशल लेटर बॉक्सच्या माध्यमातून पार पाडले. नागपूर जीपीओ येथे २७ जुलैपासून रक्षाबंधन पर्वाच्या निमित्ताने राखी स्पेशल लेटर बॉक्स हा उपक्रम राबविण्यात आला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

यात दर अर्ध्या तासाने राख्या डाक सेवेद्वारे पाठवण्याच्या उद्देश्य ठेवण्यात आला. राखी लवकरात लवकर मिळावी यासाठी नागपूर जीपीओ सोबतच शहरातील १० टपाल कार्यालयांमध्ये अशीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखी स्पेशल लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा हजारो महिलांनी लाभ घेतल्याची माहिती नागपूर डाकघर प्रवर अधीक्षक डॉ. वसुंधरा गुल्हाने यांनी दिली. 

कंन्टेन्मेंट झोनमध्येही सेवा 
गेल्या २७ जुलैपासून रक्षाबंधनाच्या कामाला टपाल कार्यालये कामाला लागले. आठवडाभरात राख्या, भेटवस्तू घरोघरी पोचविण्यात आल्या. यंदा रक्षाबंधनासाठी खास लिफाफे तयार करण्यात आले होते. याचे प्राधान्यक्रमाने वितरण करण्यात आले. कंन्टेन्मेंट झोनमधला पत्ता असला तरीही त्या पत्त्यावरील राखी, भेटवस्तू पाठवण्यात आली. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: even during the Corona crisis postal department delivered rakhi