येत्या दोन वर्षात प्रत्येकाला मिळणार घर; पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना विश्वास 

विजयकुमार राऊत 
Sunday, 22 November 2020

नागणे पुढे म्हणाले, गरजुंनी शासनाच्या घरकुल योजनासह इतरही योजनांचा लाभ घ्यावा. कुठलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा यावेळी २०२२ पर्यंत तालुक्यातील एकही कुटुंब बेघर राहु नये यासाठी कर्मचाऱ्यांनाही दक्षतेचा इशारा देऊन गावा-गावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे आदेश नागणे यांनी दिले. 

सावनेर (जि. नागपूर) :  येत्या दोन वर्षात तालुक्यातील प्रत्येकाला घर मिळेल, कोणीही बेघर राहु नये या उद्देशाने २० नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ झाला असून ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा ही योजना राबविली जात आहे. गरजूंना लाभासाठी काही अडी अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा, असे आव्हान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले.शुक्रवारी आवास दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्मचारी व व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते

नागणे पुढे म्हणाले, गरजुंनी शासनाच्या घरकुल योजनासह इतरही योजनांचा लाभ घ्यावा. कुठलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा यावेळी २०२२ पर्यंत तालुक्यातील एकही कुटुंब बेघर राहु नये यासाठी कर्मचाऱ्यांनाही दक्षतेचा इशारा देऊन गावा-गावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे आदेश नागणे यांनी दिले. 

जाणून घ्या - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न, श्री दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंद

यावेळी सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड, शाखा अभियंता दिनकर बिहारे, विस्तार अधिकारी फनिद्र साबळे, अभियंते सावरकर, वासुदेव चौधरी व पंचायत समितीचे इतर अधिकारी,सचिव उपस्थित होते.

बांधकामाचे नियोजन व भूमिपूजन

घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर गुणवत्तापूर्ण घरकुल बांधता यावे, याकरिता पंचायत समितीच्या बांधकाम विभागातर्फे मंजूर लाभार्थ्यांना बांधकामाचे नियोजन करून देण्यात आले व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही करण्यात आले. आवास योजनेतून यांच्या घराचे बांधकाम झाले अशा पाच लाभार्थ्यांच्या कुटुंबाने गृहप्रवेशही केला. यावेळी बीडीओ अनिल नागणे, सहाय्यक बीडीओ दीपक गरुड व इतर अधिकारी उपस्थित होते

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

तालुक्यातील लाभार्थ्यांची स्थिती

तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील प्राप्त उद्दिष्ट २४९७, यात मंजूर प्रकरणे २०८२ असून १२९७ प्रकरणे पूर्ण झाली आहेत. २०२०-२१ साठी १८९६ प्रकरणातील मंजुरीसाठी लाभार्थ्यांचे करारनामे करणे सुरू आहेत. रमाई आवास योजनेत ७८० प्रकरणाचे उद्दिष्ट होते यात ७५० प्रकरणे मंजूर असून ४६७ पूर्ण झाली आहेत तसेच शहरी आवास योजनेतील २१४ प्रकरणाचे उद्दिष्ट असताना २१४ प्रकरणे मंजूर होऊन १२५ लाभार्थ्यांची प्रकरणे पूर्ण झाली आहेत

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: everyone will get home in coming 2 years said BDO Anil Nagne