माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर कालवश

Ex. Vice Chancellor Dr. Madhusudan Chansarkar passes away
Ex. Vice Chancellor Dr. Madhusudan Chansarkar passes away

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे 19 मे रोजी दुपारी ह्युस्टन, (टेक्‍सास, अमेरिका) येथे मुलीकडे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांची दोन मुले कॅलिफोर्निया येथे आणि एक मुलगी ह्युस्टन येथे राहत होती. ते मुलांकडेच वास्तव्यास असत. महिनाभरापूर्वी ते मुलीकडे राहायला गेले होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

गुरुवारी त्यांच्यावर टेक्‍सास येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या स्नूषा नम्रता चान्सरकर (लाभे) यांनी दिली. डॉ. चान्सरकर यांनी 1985 ते 1988 या काळात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले होते. 14 ऑक्‍टोबर 1930 साली अकोला येथे जन्मलेल्या डॉ. चान्सरकर यांनी नागपूरच्या जी.एस. कॉमर्स महाविद्यालयातून 1951 ते 1961 दरम्यान अर्थशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी साऊथ कोरिया (1973), बांगलादेश (1974-1976), श्रीलंका (1980-82), फिलिपिन्स (1984) येथे तांत्रिक सल्ल्लागार म्हणून काम केले. यानंतर 1985 ते 1988 दरम्यान नागपूर विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्य केले.

1989 ते 1992 दरम्यान ते नायजेरिया येथील मुख्य तांत्रिक सल्लागार होते. त्यांनी तयार केलेल्या कामगार संघटनांवर आधारित प्रकल्प तयार केले. ज्यांना युनायटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फुंडमधून अनुदान मिळाले. 1992 मध्ये सेवानिवृत्त झाले. यानंतर ते विविध आर्थिक नियोजन समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत होते.

राज्य आणि केंद्रातील विविध समितींवर त्यांनी काम केले होते. तसेच "अर्थशास्त्र प्रणित भगवतगीता', 'गीतप्रणीत अर्थरचना' यांचा समावेश होता. त्यांच्या मागे पत्नी कौमुदिनी, दिनेश आणि मंगेश अशी दोन मुले आणि डॉ. लीना सोनवलकर आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com