पुन्हा कामठीत सैनिकांच्या छावणीत उडाली खळबळ; काय झाले बरे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला सैनिक हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशाखापट्टणम येथून
सैनिक प्रशिक्षण आटोपून कामठी येथील उंटखाना परिसरातील फायरिंग रेंज सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत आला होता. त्याला सैनिक प्रशासनाच्या वतीने 14 दिवस तेथील विशेषगृहात क्‍वारंटाइन करण्यात आले होते,

कामठी (जि.नागपूर): कामठी छावणी परिषद हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसरातील सैनिक फायरिंग रेंज परिसरात रविवारी मिळालेल्या बाधित सैनिकांच्या संपर्कात आलेले सहा सैनिक आज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बाधित सैनिक रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. त्यामुळे सैनिक प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे. या सहाही कोरोना पॉझिटिव्ह सैनिकावर कामठी मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फायरिंग रेंजमधील 33 सैनिकांना क्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

अधिक वाचा : कचरा रे कचरा, किती वाढला तुझा भाव, वजनासाठी केला जातो हा प्रकार...

एक सैनिक उंटखाना फायरिंग रेंजमधून परतला
कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला सैनिक हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशाखापट्टणम येथून
सैनिक प्रशिक्षण आटोपून कामठी येथील उंटखाना परिसरातील फायरिंग रेंज सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत आला होता. त्याला सैनिक प्रशासनाच्या वतीने 14 दिवस तेथील विशेषगृहात क्‍वारंटाइन करण्यात आले होते, तसेच त्याच्या संपर्कात आलेले व अति जोखीम असलेले तसेच सैनिक प्रशिक्षण केंद्रातील निवासस्थान परिसरातील सहा सैनिकांची रविवारी मिलिटरी रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता त्याचा चाचणी अहवाल आज सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा :  लॉकडाउनच्या काळात सॅनिटायझरची लागली लत,परंतु आता भोगावे लागतील गंभीर परिणाम...

विभागीय कामकाज करताना बाधित
या सहाही कोरोना पॉझिटिव्ह सैनिकावर कामठी मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याअगोदर गुरुवारी सैन्य विभागाच्या फायरिंग रेंजमध्ये आढळलेला कोरोनाबधित हा सैनिक नुकताच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील तुर्कीवरून विभागीय कामकाज आटोपून इतर पाच लोकांसह शासकीय वाहनाने कामठी कॅन्टोमेंट परिसरात आले असता या सहाही सैनिकांना काळजी घेण्याच्या उद्देशाने एका विशेष खोलीत मागील चार दिवसांपासून क्‍वारंटाइन करण्यात आले होते. या सहामधून एका सैनिकाला कोरोनाचे लक्षण आढळताच त्वरित त्याची कामठी मिलिटरी हॉस्पिटल येथे नेऊन कोरोनाची तपासणी केली असता रिपोर्ट अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारार्थ कामठी मिलिटरी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील विलगीकरण कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement erupted again in the camp of soldiers in Kamathi