... तर खराब बिअर ग्राहकांच्या घशात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

बारमध्ये लाखो लिटर बिअर असून ती खराब होण्याची मार्गावर आहे. बिअर खराब झाल्याच बार चालकांचे मोठे नुकसान होईल. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने बिअर बारमधील दारूविक्रीस परवानगी दिल्याची चर्चा आहे.

नागपूर : दारूविक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी बार बंद आहेत. या बारमध्ये लाखो लिटर दारू व बिअर पडून आहे. या बिअरची मुदत संपण्यात जमा असल्याचे सांगण्यात येते. गृह विभागाने बारमधील साठा विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या बिअरची विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. विक्रेत्यांकडून सर्वच बिअरची विक्री होण्याची शक्‍यता आहे. याची तपासणी करण्याची यंत्रणा नसल्याने मुदतबाह्य (खराब) बिअर ग्राहकांच्या घशात जाऊन जिवाला धोका उत्पन्न होण्याची धोका व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर घरपोच दारूविक्रीला परवानगी दिली. बारमध्ये असलेला 24 मार्च पूर्वीचाच साठा विक्री करण्यास परवानगी आहे. बिअरची विक्री निश्‍चित मुदतीत झाली नाही तर ती खराब होते. बारमध्ये लाखो लिटर बिअर असून ती खराब होण्याची मार्गावर आहे. बिअर खराब झाल्याच बार चालकांचे मोठे नुकसान होईल. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने बिअर बारमधील दारूविक्रीस परवानगी दिल्याची चर्चा आहे. हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात आहे.

वाचा- सिनेमागृहातील डोअरकीपर म्हणतात, नव्या जमान्याने जुना जमाना केला उद्‌ध्वस्त

 नागपूर जिल्ह्यात 100 वर बार असून प्रत्येकाकडे शेकडो पेट्यांचा साठा शिल्लक आहे. मुदतबाह्य बिअर नष्ट किंवा बाहेर ठेवण्याची यंत्रणा विभागाकडे तोकडी आहे. फायद्यासाठी मुदतबाह्य बिअरची विक्री होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विक्री करताना बार मालकांकडून मुदतबाह्य बिअरची होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशाप्रकारचे शितपेय पिल्यास आम्लपित्त, भूक मंदावणे, पोटात जळजळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expired bear may be serve to custmer