संतापजनक! फेसबुक फ्रेंडने केला युवतीवर बलात्कार

अनिल कांबळे
Sunday, 4 October 2020

रियाला त्याने वॉट्सॲप क्रमांक मागितला. दोघांच्या तासानतास चॅटिंग सुरू झाल्या. सावजाच्या शोधात असलेल्या जग्गूच्या जाळ्यात रिया चांगली अडकली होती. त्यानंतर व्हिडिओ कॉल आणि एकमेकांना फोटो पाठवणे सुरू झाले. त्याने रियाला भेटायला बोलावले. दोघांनीही फुटाळ्यावर भेट झाली. जग्गूने रियाला पक्के जाळ्यात फसवले.

नागपूर : फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या घरात घुसून बलात्कार केला. तिचे मोबाईलने नग्न फोटो आणि व्हीडिओ काढले. ते नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंधासाठी बाध्य केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगदीश केशव आर्वीकर (वय २३, रा. बांगलादेश, नाईक तलाव, पाचपावली) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही टिमकी परिसरात राहते. तिचा आई गृहिणी आहे तर वडील व्यवसाय करतात. रिया बी.ए. द्वितीय वर्षाला शिकते तर तिची बहीण बारावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी जगदीश आर्वीकर याने शिक्षण सोडले असून तो बेरोजगार आहे. जग्गूने २ एप्रिल २०१८ मध्ये रियाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ॲक्सेप्ट करताच त्याने मॅसेज करणे सुरू केले. दोघांचेही मॅसेंजवर बोलणे वाढले.

जाणून घ्या - अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

रियाला त्याने वॉट्सॲप क्रमांक मागितला. दोघांच्या तासानतास चॅटिंग सुरू झाल्या. सावजाच्या शोधात असलेल्या जग्गूच्या जाळ्यात रिया चांगली अडकली होती. त्यानंतर व्हिडिओ कॉल आणि एकमेकांना फोटो पाठवणे सुरू झाले. त्याने रियाला भेटायला बोलावले. दोघांनीही फुटाळ्यावर भेट झाली. जग्गूने रियाला पक्के जाळ्यात फसवले. तिला थेट लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे त्याच्या प्रेमात रिया पार वेडीपीसी झाली होती.

घरात घुसून केला बलात्कार

रियाला भेटीसाठी वारंवार तगादा लावत असल्यामुळे घरी कुणी नसल्यामुळे तिने घरी बोलावले. जग्गू घरी आला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता लग्न करण्याचे आमिष दिले. त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने रियाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले.

अधिक माहितीसाठी - #SundaySpecial : ‘झणझणीत सावजी मटण’ खाल्ल ना... वाचा मग कसा झाल जन्म

फोटो व्हायरलची धमकी

दोन वर्षांपासून जगदीश हा तिच्या घरी येऊन शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत बलात्कार करीत होता. तसेच लॉजवरही नेत होता. त्याला नकार दिल्यास तो थेट नग्न फोटो आणि व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॉट्सॲपवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसेच तो लहाण बहिणीवरही त्याचा डोळा होता. बहिणीची बदनामी होऊ नये म्हणून तिने आईला प्रकार सांगितला. दोघींनीही पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी जगदीश आर्वीकरला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Facebook friend tortured a young girl