
घाऊक बाजारात वाटण्याच्या ४ ते ५ गाड्या येऊ लागल्या असून, मागणीच्या तुलनेत अतिशय अल्प आहे. त्यामुळे भाव वाढलेले आहे, अशी माहिती भाजी व्यापारी राम महाजन यांनी दिली.
नागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मटार आणि गाजराची आवक प्रभावित झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मटार आणि गाजराचे दर ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
थंडीच्या हंगामात भाज्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने या काळात बाजारात चांगल्या दर्जाचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. शेतकरी आंदोलनापूर्वी हिरव्या मटार आणि गाजराची आवक वाढल्याने घाऊक बाजारात प्रति किलोचे दर २० रुपयांवर आले होते. आंदोलनामुळे पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली परिसरातून येणारे हिरवा वटाणा आणि गाजराची आवक ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.
रिया १७ ची तर सुशांत २० वर्षांचा; संसार फुलण्यापूर्वीच विखुरली स्वप्ने
घाऊक बाजारात वाटण्याच्या ४ ते ५ गाड्या येऊ लागल्या असून, मागणीच्या तुलनेत अतिशय अल्प आहे. त्यामुळे भाव वाढलेले आहे, अशी माहिती भाजी व्यापारी राम महाजन यांनी दिली. शिमला मिरचीची आवक रायपूर, भिलाई येथून होत असून इतर भाज्यांची आवक स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. घाऊक बाजारात प्रति किलो २० रुपयावर आलेला गाजर आणि हिरवा वटाणा आता ४० रुपयाच्या घरात मिळत आहे.
भाजीपाल्याचे दर आवाक्यात
भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले आहेत. हिवाळा ऋतू हा हिरव्या पालेभाज्यांसाठी उत्तम असतो.
- संगीता गावंडे, गृहिणी
घाऊक बाजारातील भाजीचे भाव (प्रति किलो)
वांगे | २० ते २५ रुपये |
शिमला मिरची | ३० रुपये |
कोहळ | ३० रुपये |
मेथीची भाजी | दहा रुपये |
पालक | सात रुपये |
गवार शेंगा | २० रुपये |
कारले | २० रुपये |
चवळीच्या शेंगा | २० रुपये |
पानकोबी | १० रुपये |
फुलकोबी | १० रुपये |
टोमॅटो | २५ रुपये |
संपादन - नीलेश डाखोरे