शेतकऱ्यांवर पुन्हा आली सावकाराच्या दारात जाण्याची वेळ, का...?

farmers go to the money lender's door again
farmers go to the money lender's door again

नागपूर  : कोरोनाच्या नियंत्रणासाठी लादण्यात आलेल्या अटींमुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. शेतमाल घरीच पडून असल्याने कर्जाची परतफेड करणे अवघड झाले. यामुळे नव्याने कर्ज मिळणार नसल्याने त्यांना पुन्हा एकदा सावकाराच्या दारात उभे राहावे लागणार आहे.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकारने लॉकडाउन केले. यामुळे सर्वच उद्योग, काम आणि व्यवहार ठप्प आहेत. ट्रान्सपोर्टही बंद असल्याने शेतकऱ्यांना मालाची विक्री करता आली नाही. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस, सोयाबीन, गहू, चणा, तूर घरातच पडून आहे. याची विक्री करता आली नसल्याने हातात पैसाच नाही. ज्या शेतकऱ्यांनी बॅंकेतून कर्ज घेतले, त्यांना परतफेड करता येत नाही.

काही बॅंकांनी कर्ज फेडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. परंतु, कर्जाची परतफेड केल्याशिवाय नव्याने कर्ज मिळणे शक्‍य नाही. आता शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतकऱ्यांनी नांगरणी सुरू केली आहे. पुढच्या महिन्यात पाऊस पडताच पेरणीला सुरुवात होईल. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर साहित्यांची गरज भासणार आहे. याकरिता पैशाची गरज आहे. सरकारने शेतमाल खरेदीला परवानगी दिली. परंतु, एका दिवशी दहा आणि 20 शेतकऱ्यांचा माल खरेदी होत आहे.

सर्व शेतकऱ्यांचा माल विक्रीस अनेक दिवस लागतील. बहुतांश शेतकरी बॅंकेतून कर्ज घेऊन परतफेड करतात. परंतु, आता मालाची विक्री झाली नसल्याने पैसा नाही. त्यामुळे बॅंकांकडून कर्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांना कर्जासाठी पुन्हा एकदा सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


मागेल त्याला कर्ज देण्याची गरज
सरकारने कर्जमाफी दिली. ही प्रक्रिया सध्या थंडबस्त्यात आहे. त्याच्या कर्जाची परतफेड होणार आहे. सध्या तो आर्थिक अडचणीत आहे. कोरोनामुळे यात भर पडली. शेतकऱ्यांना तारण्यासाठी थकित कर्ज न पाहता मागेल त्याला कर्ज देण्याची गरज आहे.
-संजय सत्यकार, शेतकरी नेते


बाजारपेठेत मोकळीक द्यावी
खरीप हंगाम तोंडावर असताना हातात पैसा नाही. घरात अडकून पडलेले नगदी पीक विक्रीसाठी बाजारपेठेत थोडी मोकळीक द्यावी. शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध होईल, अशी योजना सरकारने आखली पाहिजे.
-समीर उमप, सदस्य जि. प.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com