"मायबाप सरकार, अवंदा डुबलो, आता जगायचं कसं?" कास्तकारांचा आर्त सवाल 

मनोहर घोळसे
Tuesday, 8 December 2020

यंदा तर अगोदरच कोरोनाचे सावट यातच पावसाचे अति प्रमाण यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन बुडाले. मका उत्पादन घटले. भाजीपाला आणि फळशेतीला चांगलेच फटके बसले. कपाशीचे पीक थोडेफार बचावले असताना तालुक्यात खोड किडींचा व बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधांच्या फवारण्या करूनही कपाशी उत्पादन बुडाले. 

सावनेर (जि. नागपूर) : सलग चार-पाच वर्षापासून राज्यात कधी ओला, तर कधी कोरड्या अशी दुष्काळाची परिस्थिती आणि बदलत्या वातावरणामुळे कीड रोग, बोंड अळीचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे सर्वच प्रकारची पिके बुडत आहेत. याचा थेट परिणाम कृषी विकासावर आणि शेतकरी बांधवांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. 

यंदा तर अगोदरच कोरोनाचे सावट यातच पावसाचे अति प्रमाण यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन बुडाले. मका उत्पादन घटले. भाजीपाला आणि फळशेतीला चांगलेच फटके बसले. कपाशीचे पीक थोडेफार बचावले असताना तालुक्यात खोड किडींचा व बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधांच्या फवारण्या करूनही कपाशी उत्पादन बुडाले. 

अधिक वाचा - सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित

शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक झळ सहन करावी लागत असल्याने डबघाईस आलेले चिंताग्रस्त तालुक्याच्या अनेक गावातील शेतकरी बांधवांनी, सरकार आम्ही बुडालो असा टाहो फोडीत निदान कुटुंबासाठी तरी आता जगायचं कसं, असा प्रश्न येथील स्थानिक प्रशासनाला विचारीत आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी शासनाला निवेदन सादर केले आहे. 

सततच्या नापिकीमुळे हवालदिल झालेले तालुक्यातील कष्टकरी शेतकरी मात्र यंदाचे साल तरी लाभदायक ठरेल. चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी आस बाळगत असताना यंदाही शेतकऱ्यांच्या आशेवर अतिपावसाने व खोड कीड व बोंड अळीच्या प्रादुर्भावाने पाणी फेरले आहे. शेतकऱ्यांची ही दयनीय स्थितीविषयी येथील पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे आणि सालई येथील सधन शेतकरी मनोज मिरचे शेतकऱ्यांवर जीवन जगण्याचे मोठे संकट ओढवल्याचे सांगतात. 

पीक सर्वेक्षणासाठी व मोबदल्यासाठी दिले निवेदन 

सावनेर तालुक्यातील उमरी, नांदा, सालई ,केळवद जटामखो, पंढरी,खापा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची भेट घेऊन त्यांना आपबीती सांगून पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शासनाने सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे मागणीसाठी गोविंदा ठाकरे, मनोज मिरचे, शालिकराम घोरमाडे, शंकर मोवाडे, गौतम पाटील ,गजानन मिरचे, मनोहर घोरमाडे, काशिनाथ पटे, श्रावण जोगी, गुणवंत काळे, आदींनी निवेदन सादर केले. या विषयी कृषी विभागालाही माहिती देण्यात आली. 

सविस्तर वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण

स्थानिक गिरण्यांनाही बसणार फटका 

तालुक्यात कपाशी उत्पादनात घट झाल्याने स्थानिक सूतगिरण्यांना कापूस खरेदीची चिंता वाटू लागली आहे. येथील हिंगणा सूतगिरणी पाटणसावंगी सूतगिरणी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार भाव टिकून राहतो गिरण्या नाही. वाहतुकीचा खर्च परवडणारा ठरतो, मात्र त्यांना कापसाच्या गाठींचा स्थान मिळेल की नाही, ही चिंता गिरणीच्या संचालक मंडळाला वाटू लागली आहे. कपाशीला बोंडे कमी व परिपक्व नाही. त्यामुळे कापूस वजनाला हलका भरत आहे. कुठे दोनच वेचे होत आहे, तर कुणी रोटावेटर चालवून रब्बी हंगामाची आस बाळगत असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers who frustrated because of heavy rain are aske question to government