esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

The father molested the young girl

18 जूनपासून त्याचा त्रास वाढला होता. वडीलच असे कृत्य करीत असल्यामुळे कुणाकडे तक्रार करावी असा प्रश्‍न मुलीला पडला होता. बदनामीपोटी ती गप्प होती. सततच्या त्रासला कंटाळून तिने चाइल्ड लाइनसोबत संपर्क करून मदत मागितली. त्याआधारे वासनाधुंद बापाचा अश्‍लील प्रकार उघडकीस आला.

बापच मुलीला म्हणायचा, 'इतर माणसांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडील' अन्‌...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि. नागपूर) : वडील आणि मुलीचे नातं पवित्र समजले जाते. मुली या वडिलांच्या सर्वाधित जवळ असतात. आईपेक्षाही वडील मुलीला जास्त प्रेम देत असतो. त्यामुळे मुली वडिलांच्या लाडक्‍या असतात. समाजात याचे अनेक उदाहरण आहेत. मुलीचे लग्न झाल्यावर वडिलांनाच सर्वाधिक दुख होते, असे म्हणतात. हे खरं असलं? तरी, मुलींवरच वाईट नजर टाकणाऱ्या वडिलांची या समाजात कमी नाही. आपल्या पोरीलाच हैवानासारखं नोचून खाणारे बाप वाढले आहेत. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कन्हान तालुक्‍यातील सतरापूर येथे एक कुटुंब वास्तव्यास आहे. वडिलाला दारूचे व्यसन जळले आहे. तो नेहमी दारू पिऊन असतो. तो दारूच्याच आहारीच गेला आहे. त्याची पत्नी बाहेरगावी होती. हीच संधी साधून त्याने आपल्याच मुलीचा छळ करायला सुरुवात केली. तो मुलीला नेहमी दारूचे ग्लास बनवून मागत होता. "इतर माणसांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडील' अशा शब्दात बोलून दररोज वाईट उद्देशाने मुलीच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग करीत होता.

हेही वाचा - हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य

18 जूनपासून त्याचा त्रास वाढला होता. वडीलच असे कृत्य करीत असल्यामुळे कुणाकडे तक्रार करावी असा प्रश्‍न मुलीला पडला होता. बदनामीपोटी ती गप्प होती. सततच्या त्रासला कंटाळून तिने चाइल्ड लाइनसोबत संपर्क करून मदत मागितली. त्याआधारे वासनाधुंद बापाचा अश्‍लील प्रकार उघडकीस आला. 

याप्रकरणी पीडित मुलीने आईला सोबत घेऊन गुरुवारी कन्हान पोलिसात वडिलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बातमी लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती. पुढील तपास उपनिरीक्षक नंदा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

आईने सांगितला प्रकार

वयात आलेल्या सतरा वर्षीय मुलीचा बापच छळ करीत होता. तिचा विनयभंग करीत होता. 18 जूनच्या अगोदरपासून शिवीगाळ करून त्याच्या मनाप्रमाणे वागणे व वाईट उद्देशाने शरीराला स्पर्श करीत असायचा. याला कंटाळलेल्या मुलीने हिंमत दाखवली. आईच्या मदतीने तिने तक्रार दाखल केली. वडिलानेच मुलीचा विनयभंग केल्याचे आईने पोलिसांना सांगितले.

go to top