चॉकलेटचे आमिष दाखवून 50 वर्षीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार

अनिल कांबळे
गुरुवार, 4 जून 2020

तीन महिन्यांपूर्वी संधी सापडताच पंडितजीने शाळेतून आलेल्या सोनाक्षीला खूप चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले. तिला चॉकलेट दिल्यानंतर अश्‍लील चाळे केले. त्यानंतर तिचे तोंड दाबून पाशवी बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास भाऊ आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली.

नागपूर : शेजारी राहणाऱ्या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. ही धक्‍कादायक घटना कपिलनगर परिसरात उघडकीस आली. रवी तुमडाम उर्फ पंडितजी (वय 50, रा. कपिलनगर) असे आरोपी नराधमाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी उर्फ पंडितजी हा गेल्या सहा महिन्यांपूर्वीच कपिलनगरात राहायला आला होता. सुरुवातीपासूनच त्याची वागणूक संशयास्पद होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नव्हते. त्याच्या घराच्या काही अंतरावर पीडित दहा वर्षीय मुलगी सोनाक्षी (बदललेले नाव) हिचे कुटुंब राहते. सोनाक्षीचे वडील एमआयडीसीतील एका कंपनीत मजूर आहेत तर आई वस्तीत धुणीभांडी करते.

क्लिक करा - नववी ते बारावीच्या वर्गांबाबत शिक्षण संस्था मंडळाने दिली महत्त्वाची सूचना...

तिला 12 वर्षाचा मोठा भाऊ आहे. दाम्पत्य रोज कामावर गेल्यानंतर पंडितजी हा घरासमोर येत होता. सोनाक्षी तिच्या भावाला चिप्सचे पाकिट, चॉकलेट देत होता. सुरुवातीला शेजारी असल्यामुळे कुणी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, विकृत स्वभावाच्या पंडितजीची नजर सोनाक्षीवर होती. सोनाक्षी शाळेतून घरी आल्यानंतर तिला जवळ बोलावणे, तिच्या अंगाला स्पर्श करणे किंवा तिच्याशी लगट तो करायला लागला. मात्र, तो नियमित चॉकलेट देत असल्यामुळे सोनाक्षीने त्याबाबत आई-वडिलांकडे तक्रार केली नाही. 

तीन महिन्यांपूर्वी संधी सापडताच पंडितजीने शाळेतून आलेल्या सोनाक्षीला खूप चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले. तिला चॉकलेट दिल्यानंतर अश्‍लील चाळे केले. त्यानंतर तिचे तोंड दाबून पाशवी बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास भाऊ आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या सोनाक्षीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही.

अधिक माहितीसाठी - मुंबईतून निसर्ग वादळ जात नाही तोच दुसरं मोठं राजकीय वादळ

लैंगिक शोषणाची वस्तीत चर्चा

पंडितजी हा फक्‍त सोनाक्षीला चॉकलेट देत असल्यामुळे अनेकांना संशय येत होता. वाटेल तेव्हा तो सोनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जात होता. तिचे लैंगिक शोषण केल्यानंतर धमकी देत होता. गेल्या महिन्याभरापासून पंडितजीच्या कृत्याची वस्तीभर चर्चा होती. मात्र, कुणीही खुलून बोलायला तयार नव्हते. 

पोलिसांनी दिले हाकलून

वस्तीतील तीन ते चार युवकांनी पंडितजीच्या कृत्याला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कपिलनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदाराची भेट घेतली. घडत असलेला प्रकार सांगितला. मात्र, ठाणेदाराने "तुम्हारे पास क्‍या सबूत हैं' असे सवाल करून युवकांना आल्यापावली परत पाठवले. तसेच साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखविले नाही, असा आरोप होत आहे. 

चाईल्ड हेल्पलाईन धावली मदतीला

मध्यप्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या मजूर दाम्पत्याच्या पाठीशी कुणीही नसल्यामुळे सोनाक्षीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांनी चुप्पी साधली होती. मात्र, इंडियन सेंट्रल फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट चाईल्ड लाईन सहयोगी संस्थेच्या समन्वय छाया राऊत गुरूव, सदस्या अंकिता गडपायले यांना माहिती मिळाली. त्यांनी बालसंरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांच्याशी चर्चा करून स्वःत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंकिता आणि छाया यांनी शासकिय प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक कार्यकर्ते निखिलेश मेश्राम यांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणला.

हेही वाचा - नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सलून, स्पाबाबत आला हा निर्णय...

अंगावर काटा आणणारे कृत्य

50 वर्षीय रवी उर्फ पंडितजी तुमडाम हा विकृत मनोवृत्तीचा होता. तो डोळ्यातून अश्रू येईपर्यंत अनैसर्गिक अत्याचार करीत होता. रडल्यास तोंडात रूमाल कोंबत होता. नखाने ओरबडणे आणि दाताने चावणे असा विकृतपणा करीत होता, अशी आपबीती दहा वर्षीय सोनाक्षीने चाईल्डलाईनला सांगितली. सोनाक्षीने आपबीती सांगितल्याने ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहत होता, अशी माहिती छाया गुरूव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty year old man raped small girl