शेतात काम करणाऱ्या विवाहितेशी साधली जवळीक अन्‌ केले गर्भवती

अनिल कांबळे
Thursday, 2 April 2020

विनायक परिचित असल्याने तिने सहज विश्‍वास ठेवला. तो तिला आपल्या कामावर घेऊन गेला. सोबत सोबत काम करीत असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. यातून त्यांच्यात शरीरिक संबंध प्रस्थापित झाले. सतत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने विवाहिता गर्भवती झाली.

नागपूर : शहरातील एका 23 वर्षीय युवतीचा वर्षभरापूर्वी लग्नसोहळा पार पडला. लग्न होऊन काहीच महिने झाले असताना तिचे पतीसोबत मतभेद होत होते. त्यांनी अनेकदा आपल्या नात्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही केल्या जमेना. सतत होणाऱ्या मतभेदाला कंटाळून विवाहितने पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. पतीचे घर सोडत ती माहेरी राहायला आली. विवाहितेच्या या स्थितीचा लाभ घेत परिचित व्यक्‍तीने केले असे... 

नाव विनायक जगण भोरभन्नारे... वय 55 वर्षे... राहणार हिंगणा तालुक्‍यातील मलकापूर... हा दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करतो. त्याच्या शेतात काम करण्यासाठी काही महिलांची आवश्‍यकता होती. त्यामुळे त्याने महिलांचा शोध घेणे सुरू केले. महिलांना विचारपूस करीत असताना त्याची नजर ओळखीच्या विवाहितेवर पडली. 

अधिक वाचा - लॉकडाऊनमध्येही त्याने आईची अखेरची इच्छा केली पूर्ण, मात्र...

त्या विवाहितेच वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत सतत होणाऱ्या भांडणामुळे तिने सासर सोडून माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. माहेरी राहत असताना घरच्यांना हातभार लावता यावा म्हणून तिने काहीतरी करण्याचे ठरवले. मात्र, उच्च शिक्षण न घेतल्याने तिला काम मिळत नव्हते. यामुळे ती चिंतेत होती. घरी रिकामे कसे राहावे असाच विचार तिच्या मनात घर करीत होता. लवकरात लवकर काम मिळावे यासाठी ती प्रयत्न करीत होती. अशात विनायक तिला भेटला. तिने विनायकने सांगितलेल्या कामावर जाण्याचा निर्णय घेतला. 

विनायक परिचित असल्याने तिने सहज विश्‍वास ठेवला. तो तिला आपल्या कामावर घेऊन गेला. सोबत सोबत काम करीत असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. यातून त्यांच्यात शरीरिक संबंध प्रस्थापित झाले. सतत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने विवाहिता गर्भवती झाली. तरीही त्यांचे संबंध सुरूच होते. पाहता पाहता विवाहिता सात महिन्यांची गर्भवती झाली. यामुळे विवाहितेने विनायकला लग्नाची मागणी घातली. 

परंतु, लग्न करण्याच्या तयारीत नसलेल्या विनायकने स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे चिडलेल्या विवाहितेने आई-वडिलांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोंढाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्‍याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विनायकला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली.

असे का घडले? - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल

लग्नाच्या आमिषाला बळी पडली विवाहिता

वर्षभरातच पतीपासून विभक्‍त झालेली विवाहिता एकटी पडली होती. विविध प्रश्‍न तिच्या मनात घर करीत होते. अशात परिचित विनायकने तिला काम मिळवून दिले. यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्याच विनायकने तिला लग्नाचे आमिष दाखवून बायको बनवून ठेवण्याचे आश्‍वासन दिले. विवाहितेने त्याच्या बोलण्यावर विश्‍वात ठेवत शारीरिक संबंध प्रस्थापित करू दिल. विनायक एक सप्टेंबर 2019 पासून सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. यातून विवाहिता सात महिन्यांची गर्भवती झाली. यानंतर विनायकने लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. यामुळे तिन पोलिस ठाणे गाठून विनायकविरुद्ध तक्रार दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fiftyfive year old men raped in Nagpur